Tuesday, October 18, 2011

आळ्वाचा थेंब ...

तिने पहिले कधी स्वप्न माझ्या डोळ्यातील,
मग तिला हि कळेल, ती किती सुंदर आहे.
समजली अर्थ कधी माझ्या शब्दांचा,
तर कळला असता तिला मर्म त्यातला.
जर पहिले कधी तिने थेंब डोळ्यातला,
कळले असते तिला दर्द त्या मागचा.
थांबली कधी असती ती वाट पाहण्यास,
कळला असता तो क्षण यातनांचा.
भिजली असती ती चिंब पावसात,
कळली असती उब ह्या बहुतील तिला.
प्रीत कधी केली तिने न केले ते प्रेम,
माझ्या प्रेमाला दिले रूप जसे आळ्वावरचे थेंब.

Monday, October 17, 2011

सखे पाउस आणि तू संगेच येत जा

सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
म्हणजे त्या क्षणांना वेगळाच अर्थ येईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
म्हणजे त्या इंद्र धनुला हि नवीन रंग प्राप्त होईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
मग ती सृष्टी हि स्वतःच त्या जलधारात न्हात राहील.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
मग मी हि चिंब होईल, 
तुझ्या गालावरून ओघाणाऱ्या त्या थेम्बाना माझ्या ओठावर घेईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
मग माझ्या या असण्याला जिवंतपण येईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
सगळी कडे पाणी आणि माझ्या आनंद अश्रूंची हि बरसात होईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
म्हणजे मी हि जरा वेळ तुझ्या सोबत राहील,
अन सर्व काही विसरून तुझाच मी होईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा.....

Friday, October 14, 2011

जा जरा पावसात तू हि भिजून ये, 
दोन थेंब माझ्या वाट्याचे त्याकडे मागून ये.
नसेल मला घेता येत आनंद त्याचा,
तू मात्र मनसोक्त भिजून ये.
तुझ्या भिजलेल्या केसांतील थेम्बाना मात्र हलकेच माझ्या हातावर दे.
ते ओघळून टप टपनारे थेंब मी माझ्या हृदयात साठवून ठेवीन,
तुझ्या सोबतच्या क्षणांना मी सदैव ह्या हृदयात ठेवीन.
नसेल माझ्या जवळ जेव्हा तू किवां हा ऋतू, 
तेव्हां ह्याच काही सुंदर आठवणींवर मी जगेन.

Tuesday, October 11, 2011

नाजूक त्या पावलांच्या खुणा तश्याच आहे,
ती दूर मात्र आठवणी जवळच आहे.
मन वेड तिच्याचसाठी, ओली कड नयनांची,
सदैव ध्यास तिचा का न तिला कल्पना याची?




हृदयातील धड धड अचानक का वाढावी,
नको नको म्हणता का ती आठवावी.
मृगजळ म्हणतात ते हेच असते का?
ती समोर असूनहि माझी नि तिची प्रीत अधुरीच राहावी.










तुझ्या माझ्यातील हे क्षण जातील सरून,
उरेल मागे फक्त आठवणीचे उन्ह.
नसेल कुठेच मग गार सावलीचा कोना,
तुला हि चालावे लागेल मग माझ्या विना.

Friday, October 7, 2011

प्रीतीची ही आग

कसे सरले दिस तुझ्या संगतीत, 
उरले ते आता आठवणीचे क्षण,
तुटला आसवांचा बांध,
सोडताना तुझा हाथ.
थांब सये नको जाऊ अशी तू दूर,
सांगायची आहे मला माझ्या मनातील हुरहूर.
कशीतरी जाते ती रात काही ती पहाट,
दिवसा मात्र तुझ्याचसाठी तुझ्या वाटेवर.
सरता सरत नाही हा दिस माझा वैरी,
तुला भेटण्याची आता आगळीच धुंदी.
कसे समजावू, तुला कसे हे कळेना,
विझता विझेना तू लावलेली प्रीतीची ही आग.
तुला माहितच आहे मी कसा तुझ्यासाठी झुरतो,
तुझ्या एका नझरेसाठी मी अजून जगतो.

Tuesday, October 4, 2011

म्हणतात जर ती तुमच्या जवळून जाताना माघारी वळून बघत असेल तर ती तुमच्या वर प्रेम करते, ती तर रोझच मागे वळून बघायची पण तिचे माझ्यावर प्रेम नाही...बहुतेक तिला डोळ्यांचा आजार असावा.

खर तर आज मला खूप काही सुंदर लिहीयायाच होत कारण पहाटेच ती माझ्या स्वप्नात येवून गेली होती आणि अजूनही तिच्या त्या सुंदर सहवासातून मी पूर्ण बाहेर आलो नव्हतो. पण का कुणाच ठावूक मी माझ्या शब्दांवरचे आज प्रभुत्व हरवून बसलो आहे, तिच्या साठी लिहावे म्हणतो पण शब्दच सुचत नाही आहे. असे मला होते कधी कधी तिच्या आठवणी आणि ती दोन्ही माझ्या जवळ असल्यावर.

सगळ्यात अवघड क्षण आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून हि न भेटता येण किवा न बोलता येण. जेव्हा त्यानेच आपल्याला तशी शपत घातलेली असते.

Wednesday, September 21, 2011

त्याला मी सतत शोधत राहतो....

टप टपताना थेंब पावसाचे मी दुरूनच पाहतो,
तो मात्र थेबांमध्ये चिंब भिजून जातो.
पडता थेंब चिखलाचे अंगावर मी त्रासून जातो,
तो मात्र त्या पाण्यात उड्या मारत जातो.
मी भिजू नये म्हणून छत्रीचा सहारा घेतो,
तो मात्र सर्व झुगारून मनसोक्त भिजत राहतो.
मी एकटाच सर्वाना दुरून पाहतो,
तो सर्वांच्या गप्पांमध्ये मिसळून जातो.
मी सर्व समस्यांचा विचार करतो,
तो हसतो आणि सारे काही विसरून जातो.
मी आठवतो कुणा तरी,
तो मात्र त्याच्या आठवणीत राहतो.
नसते कुणी जेव्हा मी उदास होऊन जातो,
तो शिळ घालत मित्रांबरोबर चालत जातो.
मी अन तो वेगळा नाही, पण तो अन मी वेगळा होतो,
माझ्यातीलच त्याला मी सतत शोधत राहतो.

आज भेट नाही न झाली काल,
गेले दिवस जसे मी नाही या जगात.
कुणी तरी येत दिलासा देवून जात, 
त्यांना काय माहित शरीराला नको कुठलाच आधार.
आता नीर डोळ्यातील सुकून जातील,
पण उमटलेल्या रेखा गालावरील तश्याच राहतील.

जगतो मी आता आठवणीच्या सहारयावर,
रोज तुझी मनाला ह्या नवी ओढ.
सावरतो जेव्हा मी ढासळते मन,
मन सावरताना ढळतो आसवांचा बांध.

जरा तू दूर जरा मी दूर,
आहेत तरी बंध आपले प्रीतीचे अतूट,
नाही वेगळी तू माझ्या हृदयातून,
तरी का ते तुझ्यासाठीच आतुर.

Friday, September 16, 2011

सावलीत चालताना सावली दिसत नाही,
पावसात कधी हे अश्रू कुणालाच दिसत नाही.
तू जवळ असताना तुझी उणीव कधीच भासत नाही.
तू नसताना मन तुझ्यासाठी हट्ट करते, मग मी त्याचे मन मोडत नाही.



मला फुलपाखरू आवडते म्हणून मी त्याला माझ्या मुठीत बंद करून ठेवत नाही,
मला चंद्र आवडतो पण मी त्याचा हट्ट करत नाही.
तशीच तू हि मला आवडते, म्हणून तू माझ्या जवळ असावे अस नाही.
कारण तू कुठे असो तू मला आवडतेस आणि आवडतच राहणार.

Wednesday, September 14, 2011

तुला विसरण्याची किंमत खूप मोठी होती,
मनात तुझी प्रत्येक आठवण रडत होती.
सावरता सावरता नयन सांडवत होते मोती,
सांडतानाही त्यांना तुझी आठवण होत होती.







कस सरता सरेना धुक तुझ्या प्रितीच,
दाटतच चालत जितक मी दूर सारल.
नवते इतके कधी टिपूस ह्या डोळ्यान गाळल,
ओघळणाऱ्या थेंबाच हातावर तळ साचल.





तुझ्या माझ्या मधील दिस कधी जातील उडून,
राहील मागे फक्त तुझ्या आठवणीच ऊन.
शोधाया तुझ फिरतील डोळे उगाच,
नसशील तू जेव्हा कसा येईल श्रावण.

Monday, September 12, 2011

तुझे न माझे नाते थेंब पावसाचे,
साचवावे परी न साचे जसे उरी भाव तुझे.
स्पर्श गार होता शहारते अंग सारे,
प्रेम तुझेच आता देते ऊब येथे.

Rainbow Over A Hillरीत हि कळली उशिरा का मला,
झाले जेव्हा सर्व तुकडे तुझे मना.
सावरता सावरता अश्रूही दाटून आले,
किती रंग होते हृदयी, सर्व बेरंग झाले.

सुटत चालले मागे तुझे गाव,
न मला न मनाला होती कुठली ठाव.
आज नयनही आश्चर्य करत होते,
कुठून हे अश्रुंचे पाट वाहत होते.

Friday, September 9, 2011

समजावतो पाऊस वेडा बरसून सारी रात,
उद्या ती येणार नाही का पाहशी तू वाट.
साचले पाणी अंगणात आणि थोडे या नयनात,
ती नाही तुझसाठी मग का तू असा अधीर मिलनास.

मी बसलो जेव्हा जेव्हा वाट पाहत तुझी,
नाही येणे जमले तुला तू अशी कशी?
मन उदास होऊन गेले सदा सांजवेळी,
मावला तो रवी पण न  मावळली वेडी आशा माझी.

तुझ्या आठवणीचा हा झरा वाहतच राहतो,
भिजण्यासाठी मी हि मग आतुर होऊन जातो.
विचारांचे वारे मनाला स्पर्श करून जातात,
तुझ्या स्मृतीचा गंध मागे ठेवून जातात.

मला आवडत तुझ्या विचारात रात्र रात्र जागायला,
तुझ्या सोबतच्या त्या क्षणांना हृदयात जपायला.
आज तुझ्यासाठी लिहीहायला शब्द कमी पडतात,
तुझ्यासाठीच ते आता माझ्या कडे हट्ट करतात.

Monday, September 5, 2011

अशीच अवचित आली समोर आज तू पुन्हा,
सोडून तुझा विचार मी जगत होतो जेव्हा.
वाटले मनाला बोलावे तुजपाशी काही,
पण तो धीर आता माझ्या मनालाही होत नाही.

तुला नसेल येत आठवण पण मला रोज येते,
तू नाही म्हणून तुला शोधण्यातच सर्व वेळ जाते.
तू अशीच आता झाली, 
रंग हाताच्या बोटावर ठेवून फुल पाखरागत उडून गेली.

मी लिहिलेल्या ओळींना आता माझाच आक्षेप असतो,
विचार वेगळे अन मी प्रत्येक्षात मात्र वेगळेच लिहितो.
शब्द अचानक मला दगा देवून जातात,
तुझा विचार नसतानाही तुलाच स्मरून जातात.
तिच्या नजरेतील प्रत्येक भाव हा घाव देत होता,
मला वाटयाचे मी एकटाच त्या नजरेचा जख्मी.
पण तिचे घायाळ तर अनेक जण होते,
फक्त त्या मध्ये माझा पहिला नंबर होता.. 

एकदा एका भवर्याला सफेद गुलाबवर प्रेम झाले, त्याने त्याला प्रपोस केले. त्यावर गुलाब बोलला ज्या दिवशी मी लाल होईल तेव्हाच मी तुला होकार देईल आणि त्या भवरयाने लगेच जवळ असलेल्या गुलाब काट्यावर आपले शरीर टोचून घेतले त्याचे ते रक्त त्या गुलाब पुष्पावर पडले. पाहता पाहता सर्व गुलाब लाल झाला. परंतु त्याचा होकार ऐकण्यासाठी तो भवरा जिवंत नव्हता. प्रेम आणि बलिदान हि एकाच नाण्याची बाजू आहेत मग आपणच ठरवायचं कि प्रेम द्यायचं कि बलिदान घ्यायचं. 

Tuesday, August 30, 2011

कधी एकटी असताना मला आठव,
तुला जाणवेल कि माझ्या वेदना कश्या आहेत.
रोज तुला आठवताना,
माझ्या हृदयात किती यातना आहे.

सगळ्यांच्या मनाला मोडून एक मन मात्र मी जपल,
त्या मनाने मात्र मला कधी का नाही मानल आपल.
वाटते आता मी कोणाच कोणी नाही,
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही आता कुणा नाही.

तू हि संगे माझ्या

उमलताना प्रीत फुला हळूच तू लाजशील का?
मी पाहताना वाट तुझी तू अवचित येवून जाशील का?
रात्र रात्र मी जगताना तू चांदण्यामध्ये दिसशील का?
मिटता डोळे स्वनामध्ये सप्तरंग भरशील का?
मला येता आठवण तू हि तिकडे रडशील का?
साचता पाणी नयनात माझ्या ओंजळीत थेंब धरशील का?
होता हृदय कोरडे तुझविन पाऊस बनून पडशील का?
मी तुला पाहताना तू मला हि पाहशील का?
नयनाच्या खेळात तुही जरा रमशील का?
जाताना मी दूर कधी तू हि मला थांब म्हणशील का?
विचारतो मी तुला ते तू कधी तरी मलाही सांगशील का?
तुझ्या हृदयाच्या स्पंदनांवर तू नाव माझे कोरशील का?
साथ मागतो मी जन्माची तू हि संगे माझ्या चालशील का?

Sunday, August 28, 2011

माझ्यातलं गाव तू सून केल,
आठवणीच भंगलेल देवूळ फक्त माग राहुन गेल.
त्या देवळात अजून हि तुझीच मूर्ती आहे,
रोझच इथे आता तुझ्या आठवणीची आरती आहे.

माझ्यातला मी हरवून तू झाली आहे,
तुझ्यातला मी मात्र आता हरवून गेला आहे.
तू तू नाही राहिली आता, अन मी न माझा,
दुरावले नाते का न कळे माझ्या मना.

तिच्या असण्यात माझ मी पण हरवत,
माझ्यातल्या तिला मग माझ असं जाणवत.
ओलावत मन माझ,
जेव्हा तिच्या नयनाच आभाळ पाणावत.


Thursday, August 25, 2011



भारावून जाते मन होते पिसाट पिसाट,
डोळ्यांच्या वाटेवर मग थेंब अफाट.
साठवता साठवता साठले आठवणीचे आभाळ,
का तिला कळतच नाही हे माझ्या मनातील तुफान.



ओळखलस का मला मी तोच जो तुला आवडायचो,
तुझ्या नयनातील थेम्बाना अलगद हातावर झेलायचो.
कुठे हरवलेस तू दिस कुठे सोडले ते क्षण,
तू असते एकटीच आता, मी हि एकटाच असा सुन्न.



तुझे तुला ठाव का तू अशी वागली,
मनातील भावनांची तू न कदर जाणली.
खेळ होता तुझ्यासाठी तो पण बाजी मी हरली,
मोडला सर्व डाव आता न कुठलीच आता आस राहिली.

Wednesday, August 24, 2011

जीव जडतो जेव्हा आभाळ दाटून येते,
तिच्या हर एक अदेमधून मुसळधार बरसात होते.
मी मागत राहतो तिला मग प्रेमाचे दान,
ती हि हसते, जेव्हा माझ्या प्रीतीला येते उधान.




Twilight Night Wallpaper
ती अशीच एक रात्र मंतरलेली,
नकळतच तुझी एक आठवण मोहरलेली,
पाहता स्वप्न तुझे नयनात,
अलगद ती तुझ्याच सहवासात सरलेली.

Monday, August 22, 2011

जाताना दिसल्या पाउलाच्या खुणा त्या ओल्या रेतीवर,
ती रेत होती कि हृद्य हे मात्र अजून कळले नाही.
एकाच लाटेसरशी मात्र सर्व काही वाहून गेले,
उजाड सृष्टी हृदयाची मागे ठेवून गेले.
तीरावरती उभे राहून आता आपल्याच उध्वस्त हृदयाचे चित्र तरी कसे पहावे?
या परीच त्या हृदयापासून आता मी दूर जावे.

ती हसता हसता अचानक गप्प झाली,
मावळतीच्या सूर्यापरी आता शांत झाली.
मी आवाज देत राहिलो,ती मात्र मुकी झाली,
माझ्या प्रीत अंगणाला अशीच सोडून गेली.
तिच्या मागून गेलेत कित्येक श्रावण ओस,
पडून जलधाराहि हि भूमी कोरडीच राहिली.
तिला माहित नव्हते का हे, ती अशी का वागली,
जाताना दूर, का नाही तिने माझ्या नयनातील प्रित पहिली.

ती जलधार आता कोरडीच वाटू लागली,
भिजूनही तिच्यामध्ये प्रित माझी सुकीच राहिली.
तिच्या सहवासात मी ओलाचिंब झालो,
मात्र हृदयाची भूमी थेंबा थेंबासाठी त्रासली.
मन भरून यावे इतके का तू मला आठवावी,
साचून ठेवावी नयनात तुला तर तू अश्रूवाटे का वाहत जावी.
भरभरून यावे मन माझे मग, 
ह्या भूतलावर माझ्या अश्रूंची आज बरसात व्हावी.

माफ कर मला मी उगाच तुझ्यावर जीव लावला, 
माहित होते हे तुटणारे स्वप्न तरी उगचं डोळा लावला.
ना आठवावी तू म्हणत तुलाच आठवत गेलो,
स्पनदनंच्या हुंदक्यांना मी हसत सामोरे गेलो.

पहाटेच्या रम्य सकाळी सोडून मी उगचं जागा झालो,
तुझ्या आठवणीच्या गुंत्यात पूर्णच बुडून गेलो.
नाही मझला माझे भान आता,
हे स्वामिनी तुझ्या हृदयातील मी एक दास झालो.

वाट पाहण्यात जाई हा जन्म सारा,
आसवांच्या ओलाव्याने भिजला सर्व नयनांचा किनारा.
तो मानतच नाही आणि उभा करतो मला पुन्हा .
सर्व विचार मोडून माझे, निर्णय घेतो का आता माझ्या मना?
मी हि नाही विसरलो अन तुही नाही विसरला अजून त्या क्षणा,
सहवासातील तिच्या अन माझ्या आहेत हृदयावरती अजून काही पाऊलखुणा.

Friday, August 19, 2011

कधी पडणारा  पाऊस आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय पहिला असेल तर त्या पडणार्या पावसाच्या प्रत्येक थेम्बगानिक मन अजून भरून येते अन नकळतच त्या पावसालाही ओले करून सोडेल अशी बरसात मग या नयनातून होते. कधी एकदा जरी प्रेम केल असेल तर दुसर्याच्या प्रेमाची किमत कळते अन त्याच्या वेदनांत आपल्या वेदनांची हलकीच जाणीव होते. 

Thursday, August 18, 2011

तू येत नाहीस पण तुझ्या आठवणी मात्र सतत येतात,
तुझ्या पेक्षा आता मला त्याच जास्त प्रिये प्रिय वाटतात. 
आसुलेल्या नयनातून काही मोती सांडतात,
साठवतो मी ओंजळीत जेव्हा तुझीच प्रतिमा दावतात.

ती तिच्या स्वप्नाशी अशी कशी बेईमान झाली,
प्रीतीला माझ्या भूलवून अशीच का गेली?
साथ देणार होती जी मला, तीच का दूर झाली,
समजूनही माझ्या भावनांना ती का अशी आज निष्ठूर झाली.

मला माहित आहे माझ्या नकळत तू मला पाहते,
मी नसताना तुही माझ्या आठवणीत हरवून जाते.
स्वतः दूर राहून माझ्यापासून तू अविरत जळत राहते,
मी हि तसाच आहे ग इथे, हे तुही जाणते,
माझ्या भावांना तू समजूनहि मग का अशी अलिप्त राहते.

पाउसाचा नवीन अनुभव

नेहमी पेक्षा पेपरवाला आज लवकर आला होता, कि मीच आज उशिरा उठलो होतो? असो आज चहा पिताना हातात ऑक्सिजन ची पुरवणी होती. सहसा मी पेपर मधील सर्व लेख वाचत नाही परंतु आज गोष्टच वेगळी होती. माझा आवडता पाऊस आणि त्याच्या सोबतच माझ्या मित्रांचे अनुभव. मग मी सव्तःला रोखूच शकलो नाही. एक एक करून सर्व लेख वाचत जात होतो. प्रत्येक शब्दागणिक मनात पाऊस दाटत होता. मग तो लेख कुणी आणि कोणत्या अनुभवातून लिहिला हायचा जरा सुधा विचार ना करता फक्त एक न एक शब्द मनात साठवत होतो आणि माझ्या हि काही आठवणी त्यात आठवत होतो. आज आमचा इकडे पाऊस नाही पण मनात खूपच मेघ दाटून आले आहेत, आता घरात असल्याने फक्त बरसात मात्र होत नाही. धन्यवाद टीम ऑक्सिजन मला आणि माझ्या सारख्या माझ्याच मित्रांना पुन्हा पाउसाचा नवीन अनुभव दिल्या बद्दल. 

Wednesday, August 17, 2011

कधी कमळाच्या पानावरील दवाला बघितले आहेस का तू, त्याप्रमाणे तुझे अन माझे नाते आहे. जेव्हा ते दव पानावर असते तेव्हा त्या कमलाच्या पानाला अनोखेच सौवन्दर्य प्राप्त होते. तसेच काही माझे आहे जेव्हा-जेव्हा तू माझ्या सोबत असते तेव्हा-तेव्हा माझ्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त होतो. 
आपण जीवनात कधी ना कधी घेतलेला अनुभव आणि त्याच्या त्या आठवणी सदैव स्मरणात राहतात, जसे कि, उन्हाळ्यानंतर आणि पावसाच्या आधी खूप गरम होत असते जीव नको नकोसा होऊन जातो आणि एके  दिवशी अचानक बाहेर असताना पावूस सुरु होतो, सगळीकडे तापलेल्या त्या धरणीचा सुगंध दरवळतो आणि सोबतच आपल्या शरीरावरहि त्या गार-गार थेंबांची बरसात होत असते ...कसा सुंदर अनुभव असतो ना. तसाच थंडीच्या दिवसात पहाटे फिरायला कधी गेला आहात ...जर गेला असाल तर आपणास माहीतच असेल वरती सगळीकडे धुके आणि पायाखाली हिरवे गार गवत आणि त्यावर साठलेले  दवबिंदू ....त्यांचा तो पायाला होणारा स्पर्श ....कसे मोहरून टाकणारा अनुभव असतो ना ....अश्याच अनेक अनुभवातून जीवनातील सुंदर सुंदर घटना क्रम आणि त्याच्या सुंदर आठवणी बनत जातात.....तसाच अनुभव आपणास प्रेमातही येतो...हे सर्व अनुभव आपल्याला पुस्तकात किवा गूगल वर सापडत नाही हे स्वतःच अनुभवावे लागतात...so go for it...

Tuesday, August 16, 2011

पाऊस सुरु झाला कि मन पावसात भिजण्यासाठी आतुर होते, पण आजारीपडण्याची भीती आणि लोक काय म्हणतील ह्या लाजेने बर्याच वेळेस आपण त्या सुंदर अनुभवापासून दूर राहू पाहतो पण आपले मन आपल्याला त्या पावसात ओढतच नेते ना. तसे काही प्रेमाचे आहे, प्रेमात कितीही यातना झाल्या, कितीही दुख वाट्याला आले, कितीत हि अश्रुनी बलिदान दिले तरी आपण प्रेम करतोच.....प्रेम हि भावनाच अशी असते.

Monday, August 15, 2011

ती अशीच हसून जायची,
मी मात्र दिवस दिवस त्या हास्याचे कारण शोधत राहायचो.
आपल्याच मनाला मी तिच्या मोहात सोडून जायचो.
मी दुसरीकडे आणि मन मात्र तिच्यापाशी,
भलताच हा खेळ न्यारा, का माझी स्पंदने वाढवी.

                                       

 खूप जलधारा आज येवून जाऊ दे,
 माझ्या अश्रूनही त्यात आज नाहून जाऊ दे.
 भिजलेल्या ह्या सृष्टी बरोबर आज माझे मन हि धुवून जाऊ दे,
 नको तो ध्यास मला नको त्या आठवणी,
 बरा आहे मी असाच तुझ्याविना अतृप्त जन्मी.

Thursday, August 11, 2011

नजर

नजर बोलत राहिली शब्द मात्र मुके झाले,
तिच्या नयनातील भाव माझ्या हृदयावर काही घाव करून गेले.
कधीं कधी माझ्यावाटे वर ती उभी रहायची,
मी येताच ती हि पटकन हसायची.
असे बरेच दिवस कधी मी, कधी ती त्या वाटे वर भेटायचो,
आम्ही नसताना, ती वाट हि आता आमची वाट पाहू लागली.
एके दिवशी तिचा तो स्पर्श नकळत झाला,
माझ्या ह्या जन्माला मी तेव्हा सलाम केला.
आज ती नाही माझ्याजवळ पण तिच्या आठवणी आहेत,
नसताना हि ती तिचा आभास ह्या उरी आहे.

Wednesday, August 10, 2011

ते घनही गर्जून जातात,
मी पावसाची जेव्हा वाट पाहतो.
मनसोक्त मग तो बरसतो,
आणि माझ्या पेटलेल्या भावनांना अलगद शमवतो.
दोघेही त्रासलेले आम्ही स्वतःला साथ देत असतो,
तो त्या जलधारांनी आणि मी माझ्या अश्रूधारांनी.
मस्त उनाड होऊन मग मी त्याला साथ देत जातो,
मनातील सर्व वेदना बाजूला सारून मी लहान होऊन जातो.
तो हि मला मग मस्त साथ देतो साऱ्या सृष्टीला माझ्यासाठी भिजवून जातो.
विसरून सारे आम्ही बेभान होऊन जातो, सर्व जगापासून दूर असे एकटेच बरसत राहतो.

Tuesday, August 2, 2011

मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो तू नवी नवी भासते, 
मी जाणून घेतो तुला अन तू आणखीच अवघड होते.
तुझ्या लावण्याचा मी आता पुरता दास झालो.
तू व्हावी माझी म्हणून, मी आज काल खूपच हट्टी झालो..
ह्या श्रावणात मी पडणारा पाऊस, तू मस्त जलधारा,
निसर्ग हि आता बघ प्रीती आपल्या फुलून आला. 
तू बघतेस जेव्हा जेव्हा माझ्या कडे, मी विचलित होऊन जातो,
अन तुझ्या पुन्हा एका नजरेसाठी व्याकुळ होऊ पाहतो.
मी विचारतो माझे मला, कि तू का इतका तिच्यासाठी वेडा?
मनातून एकाच आवाज येतो ती नाही तर तुही नाही सदा.

तुला माहित आहे का तू इतकी सुंदर का दिसतेस, 
कारण माझ्या प्रत्येक सुंदर कल्पनेची तू मूर्त रूप आहेस.
का तू इतकी निरागस दिसते विचार मला एकदा,
कारण तू माझ्या प्रत्येक निरागस हास्याचे प्रतिबिंब आहेस.

तू मला जगण्याचे अजून एक कारण दिले,
निस्तेज माझ्या नयनांना तू आज पुन्हा जीवन दिले.
मी तुझ्या विना विझणार इतक्यात तू, मला श्वसन दिले,
शांत स्पन्दनाना तू आज पुन्हा छेडून दिले.

मी अन तो

कधी कधी मी वेगळा होऊन जातो,
मी माझ्यावरतीच शंका घेत राहतो.
स्वस्त बसता याची जाणीव होते,
कि मी माझ्यातच आता दोघे पाहतो.
मी प्रत्येकावर शंका घेतो,
तो प्रत्येकात प्रेम पाहतो.
मी उगाच घरातूनच पावूस पाहत राहतो,
तो मस्त कधी पावसात फिरून  येतो.
मी त्याला वेडे म्हणतो,
अन तो माझ्यावर स्मित करून पुढे निघून जातो.
मी उगाच चिडचिड करतो,
अन तो मलाच समजावत बसतो.
मी जीवनाला वैतागून जातो,
तो मात्र जीवनातील सर्व रंग उधळीत राहतो.
जे कधी कधी मला जमत नाही,
तो एका क्षणात तडीला नेतो.
तो असाच राहावा म्हणून मी प्रयत्न करत राहतो,
मात्र ह्या सर्व व्यापात मी त्याला हरवून बसतो...

Thursday, July 28, 2011

ते दोघे..

ते दोघे कॉलेज च्या पहिल्या वर्ष्यापासून सोबत होते. आता ते मास्टर्स ला आले आणि पाहता पाहता ते हि संपले.
 ती नौकरी करू लागली आणि तो हि नौकरीच्या शोधात होता. एक दिवशी तो तिच्या शहरात गेला आणि तिला फोन केला. तिने हि त्याचा नंबर पाहताच लगेच फोने उचलला. तो म्हणाला मला तुला भेटायचे आहे. तिने वेळ न दवडता लगेच होकार दिला. वेळ ठरली आणि मनात अनेक विचाराचे काहूर उठले. का आज का? कशासाठी? संध्याकाळची वेळ होती दोघेही शहराबाहेरील एका निवांत ठिकाणी भेटले. दोघेही निस्तब्ध पण डोळ्यात दोघांच्याहि अनेक भाव. असाच अर्धा तास गेला दोघेही अजून हि निशब्द होते. मग तिनेच धीर करून विचारले, काय झाल नौकरीचे ? आणि तो हि मग भानावर आला. तो म्हनाला मला परदेशात नौकरीची ऑफर आलि आहे आणि मी २ दिवसात परदेशी जाणार आहे. जाण्या अगोदर तुला भेटण्याची इच्छा होती. तिचा चेहरा लगेच सुकून गेला. तो बोलला अग जाण्या अगोदर मला तुला काही विचारायचे आहे विचारू का? ती म्हणली विचार न परवानगी कशाला मागतो. तो तिच्या डोळ्यात पाहून एक दीर्घ श्वास घेत बोलला मला तू कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडतेस पण मी तुला सांगू शकलो नाही आज हे सांगतो आहे कारण मला माहित नाही कि परत आपली भेट कधी होईल? माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू सांग तुझे हि आहे का? ती शांत झाली आणि थोड्याच वेळात त्याच्या छातीवर डोके ठेवून बोलली दुसरे कोणी आहे का तुझ्या शिवाय ह्या जगात, सांग ना. किती उशीर केलास रे? आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. त्याने तिला सावरले आणि आपल्या बाहूत घट धरून ठेवले तिच्या नयनातून पडणार प्रत्येक थेंब त्याला वेदना देत होता आणि तीचा विरह सहन करावा लागणार म्हणून आता तो हि रडत होता.......

म्हणूनच जर प्रेम केल तर सांगून टाका....be brave if u can love some one then surely u can express it...

Tuesday, July 26, 2011

तुझ्या गावाच्या पारावर मी..


तुझ्या गावाच्या बाहेरील पारावर मी,
झंकारत ये पैंजण तुझे ज्या वाटेवर मी.
नको वेळ लावू, नको काल पाहू,
सोड चाली रिती, नको अशी बावरून जावू.
वारा सुसाट आता इथे,मनात तुंफान उठल.
आडोसा तुझाच मला सये, आठवणीचे तुझ्या रान पेटलं. 
सये तुझ्या त्या आठवांचा मी दास,
प्रत्येक माझ्या स्पन्दानास तुझाच ध्यास.
वाट तुझी पाहताना तो बघ आता रवीही मावळतीला आला,
माझ्या नयनातील पाण्याचा थेंब त्याला निरोप द्यायला आला.
बघ आता नभाने हे गगन झाकून आले,
तू येत नाही म्हणून त्याला हि आता रडू आले.
तुला कसे सांगू प्रिये मी आज-काल कसा जगतो,
तू गेल्या पासून तुझ्या आठवणीतच रमतो.
तू दिलेले ते गुलाब पुष्प आज हि रोज पाहतो,
उडाला सुंगंध जरी त्याचा तरी हृदयापरी त्यास मी जपतो.

हातात हात घेवून ती एकटीच बोलत होती,
मी मात्र शांत सागरासारखा तिलाच एकात होतो.
आता तिचे शब्द मंद होत गेले,
अन तिच्या गर्द स्पर्शाने मी मोहरून गेलो.

ती..

love-picture-hug-couple-rain-orangeacidआज चिंब भिजली ती,
मी मात्र बरसत राहिलो पावसा सारखा.
ती खूप खुश होती माझ्या मिठीने,
मन माझ उदास तिच्या त्या क्षणिक भेटीने.
हळुवार केसांवरून पाणी झटकत होती ती,
मी मुग्ध मग त्या काही थेम्बाने. 
त्या थंड गारव्यात ती मला बिलगलेली,
तिच्या हृदयातील धड धड आता माझ्याही उराशी.
दूर वर पसरलेले माळरान,
अन तिच्या अन माझ्या नयनात एकमेकांचे उधान.
आता जरा सृष्टी अंधारलेली,
ती मात्र माझ्या प्रेमात मंतरलेली.
तिच्या नायांतून आता अश्रूंची बरसात होऊ लागली,
भिजले काळीज माझे अन मनाला पुन्हा भेटीची ओढ लागली.
सांभाळताना तिला मी हि गहिवरलो,
निरोप देताना तिला अश्रुनपुढे माझ्या मी हरलो.

Thursday, July 21, 2011

जेव्हा तुझे हि नयन पानावातील,
तेव्हा मी जवळ नसेल.
शोधशील तू हि मग मला,
कारण तुझ्या वाहणाऱ्या अश्रुना कोण बरे पुसेल.

तू अशीच माफी मागून निघून गेली,
मन मात्र माझ त्या खाली गुदमरून गेल.
आता तू किती हलवलेस तरी ते नाही उठणार,
कारण ते तू सोडून गेल्या गेल्याच मेल.

आता जेव्हा तू एकांतात मला आठवशील,
तेव्हा तुला मी आणि माझे प्रेम व्याकुळ करील.
किती हि तू हक मार मी नाही असणार,
कारण तू नाही तर मी हि नाही ह्या धर्तीवरी.

जेव्हा तुझे हि नयन पानावातील, 
तेव्हा मी जवळ नसेल.
शोधशील तू हि मग मला,
कारण तुझ्या वाहणाऱ्या अश्रुना कोण बरे पुसेल.





तू अशीच माफी मागून निघून गेली,
मन मात्र माझ त्या खाली गुदमरून गेल.
आता तू किती हलवलेस तरी ते नाही उठणार,
कारण ते तू सोडून गेल्या गेल्याच मेल.



आता जेव्हा तू एकांतात मला आठवशील,
तेव्हा तुला मी आणि माझे प्रेम व्याकुळ करील.
किती हि तू हक मार मी नाही असणार,
कारण तू नाही तर मी हि नाही ह्या धर्तीवरी.

ह्या श्बदानाही आता तुझी ओढ लागली,
मी ठरवतो एक आणि वास्तवात तुलाच ते उतरवी.
ते भाव तुझेच माझ्या उरी,
अन साठलेले पाणी जड पापण्यांना सोडून आता गालावरी.

मी न माझी राहिले तुला पाहता क्षणी,
नयनात तू आणि आहेस आता माझ्या मनी.
मी आता तुझ्या सारखे लिहू लागले,
माझ्या शब्दानाही आता तुझेच वेड लागले.

तू तू न राहिली आता, न राहिली ती प्रीत,
व्यर्थ जीवन सारे, प्रीतीचे हरवले सूर.
उगाच देतो साद तुला, तू कधीच आवाज पलीकडे गेली,
मी एकटाच तुझ्यासाठी वाहत राहिलो नीर.

Tuesday, July 19, 2011

एक क्षण वाटेवर तुझ्या युगा युगांच्या भेटीसाठी आसुसलेला.
हृदयातील स्पन्दनाना हि आवाज येतो तुझ्या पाउलाचा.
जशी वेळ तुझ्या येण्याची जवळ येवू पाहते,
माझ्या हृदयातील भावनाच्या सागरात वादळ येवून जाते.



ओठांवर शब्द नाही अन निशब्द झाले मनातील गाणी,
मनात दबलेल्या भावना अन नयनात पाणी.
मनात तू मात्र नजर तुला शोधते,
ओघळणाऱ्या अश्रुमध्ये हि आता तुझीच प्रतिमा दिसते.

Monday, July 18, 2011

ती खळखळून हसते आणि मला आनंद होतो,
ती हलकेच लाजते आणि मी लालबुंद होतो,
ती कधी अबोल होते ,
मी मात्र तिच्या एका-एका शब्दाची वाट पाहतो.
ती माझ्यासोबत असते,
आणि मी हे विश्वच विसरून जातो.
अन ती नसताना ती असल्याचा भास होतो,
नयन शोधतात तिला अन मन व्याकुळ होत.

सर्व शांत शांत आणि एकदम निरस झाले,
तू गेली अन ह्या जगातून प्राणच गेले.
उगाच च फिरतो मी एकटा,
ह्या वाट पाहणाऱ्या नयनांना तुझी, नकोसा आहे कुठलाच चेहरा.
कुणी तरी थांबवून उगाच विचारते,
मृत माझ्या मनाला पुन्हा पुन्हा दुखवते.


Sunday, July 17, 2011

इतक कोणावर प्रेम करू नये कि त्याच्यावीन जगन अवघड होईल, 
आपल्याच स्पन्दनाना धड धडताना त्याची आठवण येईल.
हलकेच अश्रूवाटे नयनात येईल,
गालावरून ओघळताना मग त्यानाही दुख: होईल.

Saturday, July 16, 2011

खूप घन जमा झाले, वाटते आज नभ हि जोर जोरात रडणार,
प्रिये तू माझ्या पासून दूर झाल्याचे आता त्यांनाही कळले असणार.

Friday, July 15, 2011

तो वाहणारा वारा आणि हलणारी पाने,
वळणाचा घाट आणि खडकाळ वाट,
टीप टीप पाऊस आणि सखे तुझी येण्याची मनाला चाहूल.
तू येत नाही आणि घन मात्र येतात.
हलक्याच सरी मग मन वेड करून जातात.
दिवस असे येतात आणि पटकन निघून जातात,
मागे मात्र तुझ्या न विसारणाऱ्या आठवणी ठेवून जातात.
तू मागे ठेवून गेलेल्या त्या पाऊल खुणा मी आजही पाहतो,
परतशील तू कधी तरी म्हणून, तू सोडून गेलेल्या वाटेवर मी अजून हि उभा राहतो.
ती वाट हि आता वाट पाहून थकून गेली असावी,
म्हणूनच ती हि आता वळणं वळणाने माझ्या पासून दूर झाली असावी.
पण हरकत नाही, मी न माझा हट्ट सोडून देणार न कधी तुला,
जरी हा जन्म गेला तरी, तुझ्याचसाठी मी पुढचाही जन्म घेणार.

Thursday, July 14, 2011

काही कळेना काय झाले,
माझेच शब्द आज का रुसून गेले.
उदास जरी आज मी, नाही तुझा राग, 
तूच माझी होती तेव्हा आणि माझींच आज.
खूप प्रयातनांती हे आज लिहितो,
तुझ्या समवेतच्या क्षणांना हृदयात जपतो.
तू जा विसरून मला, मी हि प्रयास करतो,
खूप दूर जातो मी, न तुला माझ्या पाऊलखुणा हि मग दिसो.

Sunday, July 10, 2011

वेड मन

कुणीतरी जवळ आहे असे वाटते,
नजर शोधत असते पण सापडत कोणीच नाही.
हलकाच वारा स्पर्श करून जातो,
मन मात्र तसू भर हि हलत नाही.
आज काल असेच होत राहते, 
कुठेच मन रमत नाही.
विसरता विसरता हलकेच मनात तुझा विचार येई.
खूप सारे विचार मात्र कोणताच माझा असा आपला नाही,
सर्वांच्या मध्ये तूच तरी तू माझ्या जवळ नाही.
सांगून पाहतो मी स्वतःलाच ती तुझी नाही,
मात्र वेड मन हे मानत नाही.
सारखेच त्याला सांगावे लागते,
कि ती आता आपली नाही.
विसरून जा तू तिला,
कारण तिला तुझी कधी किमतच कळली नाही.
हलकेच मग नयन पाणावतात,
माहित नवते कि मन हि रडते कारण मला आता रडू पण येत नाही.
वेड मन त्याला कितीही समजावले तरी मानतच नाही,
अशक्य अश्या मागणीने मला हि ते आता सोडत नाही.

Tuesday, July 5, 2011

तूच नाही तर आनंद हि नाही, 
अन उगाच माझ्या रुसण्याला आता कुठलाच अर्थ नाही.
मी तुझ्यासाठीच जे काही केले,
त्याचा मलाच त्रास झाला आणि आपल्या मैत्रीचे बंध हि सैल झाले.

तू जेव्हा जेव्हा हसतेस, मी आनंदाने फुलून जातो.
तुझ्या एका एका हास्यासाठी मी आणखीच वेडा होतो.
तू वेडी मलाच बघत असते, मी नयनात तुझ्या हरवून जातो.
विसरतो या जगाला आणि मी तुझ्यातच राहतो.

मी आज तुझ्या प्रेमापासून पोरका झालो आहे, परंतु मी तुझ्या पासून नाही.
मला जे मिळाले नाही ते तुला तर मिळू देत आणि इतके कि तुला मी आठवू हि नाही.
कारण मला माहित आहे जर तुला प्रेम मिळाले नाही तर तू नक्कीच मला आठवशील.
त्या वेळेस मात्र प्रिये मी तुझ्या सोबत नसेल,
अनगीनीत तुझ्या वाहणाऱ्या त्या अश्रुना मग कोण बर पुसेल.

Monday, July 4, 2011

रेषा

सुरुवात कोऱ्या पानापासून केली होती,
आज काही तरी वेगळाच दिसत आहे.
खूप साऱ्या रेषा अन अंत कुठेच नाही,
कोण कोणाची, अन कोणासाठी हेच आता काळात नाही.
वास्तविकता आता माझ्याही लक्षात आली,
मी प्रेमाने जपलेली हर एक रेघ आता परकी झाली.
प्रत्येक तो एक थेंब शाईचा वाहिला मी तिच्या साठी,
मात्र तिला हे कळलेच नाही अगदी माझी माझी लेखणी सुकून गेली तरी.
रोझच तो ध्यास असायचा लिहावे तुझ्या साठी काही तरी,
माहित नव्हते कि तुला सापडण्या मला परत पुसावे लागेल काही तरी.
खरच का का इतके अवघड होऊन जाते जीवन एका एकी,
नाही लागत मन कुठे तुझ्याशिवाय या जगापाठी.
किती हि मी प्रयत्न केला सोडवण्या तो गुंता,
आणखीच गुंतत गेलो नाही झालो मी मोकळा.


Friday, July 1, 2011

तू अशी....

LOVE GIRL Mobile Wallpaper
तू अशी तू कधी तशी, 
अवखळ झरा कधी खोल नदी.
टप टपनारा अश्रू नयनातला,
कधी थेंब पावसाचा नभी.
तूच चांदणी आणि तूच चंद्र हि,
रूप तुझे रूपालाही लाजवी.
तू चंचल वाऱ्यापरी,
कधी जवळ माझ्या कधी दूर कुठेतरी.
तू सप्त रंगी, 
रंगातही तू रंगुनी आहे कापसापरी बेरंगी.
तूच सप्त सुर, तूच नाद ह्या हृदयातला.
छेडतो मी प्रीत गाणे तेव्हा, झणकर तुझ्याच पाउलांचा.

Thursday, June 30, 2011


निवांत बसता बसता अचानक तू आठवावी, 
शोधात असतो मी जिच्या ती सहजच सापडावी.
ह्यापर आनंद या जगी दुसरा कुठलच नसे,
मी मागावे तुला अन तू अवचित समोर यावी.



या संजावेलेला तुझी आठवण मला व्हावी,
मी न मागताच माझी मागणी पूर्ण व्हावी.
हळूच सुटता गारवा ह्या देही शहारे यावे,
तुझ्याच हृदयात आता मी विलीन व्हावे.


मी थेंब पावसाचा तू तहानलेली धरती,
प्रीत हि अशी आगळी आपली,
तुला मिळताच मिळते मला हि मुक्ती.

रोझच तुझी वाट मी पाहीन, 
रोज तुझ्या वाटेवर मी एकटाच उभा राहीन.
नाही ऐकणार मी ह्या जगाचे,
त्यांना काय माहित कि तू जरी नाही आलीस तरी तुझी आठवण मला तिथे येते.

आज काल मी माझा राहिलोच नाही,
तुझ्या विचारनाशिवाय मला काही सुचतच नाही.
वाटते तुला हे सांगावे,
माझ्या प्रीतेचे भाव तुझ्या हि मनावर जरा उमटावे.

मी आणि माझे मन


मी दिलासा देतो मज मना, जा विसरून त्या उडून गेल्या पाखरा.  
सोड हा हट्ट तुझा, का मलाही तू देतो आता वेदना.
चूक माझीच झाली, मी मोहात तुला त्या पडले.
न होते जे कधी आपले, त्यास तुज जपाया लावले. 
तू वेडा आणि मी हि वेडा झालो त्या क्षणा,
जेव्हा सूर तिने तुझ्या मनी ते छेडले.
तुलाच मी माझ्या मोहापायी या संकटात टाकले,
आता तू हि माझा सूड घेण्यासाठी, तिच्या आठवणीचे वादळ माझ्या समोर मांडले.
मी हि कासावीस आता तुही नाही त्यातून वेगळा,
तिने आपल्या समोर न ठेवला मार्ग कुठला मोकळा.
मी आवाज देत राहिलो अन तू हि मुसमुसत राहिला,
तिने न मला पलटून पहिले न तुला दिला कुठलाच आसरा.
सोड आता तरी तू तिचा ध्यास, कर मला हि मोकळा,
मला विसरू दे अन तू हि विसर जो कधी नव्हताच आपला.

Monday, June 27, 2011

तुझ विन ....

सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,

ती पायवाट तुझीच आहे जिच्या वरती मी आहे उभा.
अजून हि तो झुला वाट्पाहून तुझी झुलतो एकटा,
त्या पारिजातकाचे फुले सुकून जातील, त्यातील गंध जो तुझ्यासाठी वेडा.
सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,
घनाची बरसात होवूनही मी तुझ्या विना तापलेला.
बघ ह्या श्रावण धारा आणि माझे अश्रू वेगळे का,
तुझ्याच साठी नयनाखाली हा महासागर दाटला.
सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,
साचलेल्या त्या काही ओंजळीतील माझ्या थेम्बाना स्पर्श करून जा.
हा गारवा आज मला मद धुंद करून जाणार आहे,
तुझ्याच प्रीतीत मी आज नाहून जाणार आहे.
सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,