Wednesday, June 27, 2012


का ग तुझ्या नयनाचे आभाळ अताच दाटल.
कुणी दिला तुला असा दुखा:चा वारा,
का ग तुझ अश्रुंच आभाळ फाटलं.
नसे तुला कुठलाच आज गंध,
का तू अशी बावरी सर्व तोडून बंध.

हलक्याच त्या सरी आज बरसून गेल्या,
तुझ्या आठवणी पुन्हा जाग्या करून गेल्या.
प्रत्येक थेंब मातीचा सुगंध वाढवत होता,
पेटल्या मना माझ्या तो शांत करत होता.

तिच्या शब्दातून मी आज जिवंत झालो,
असण्यात माझ्या मी धन्य झालो.
स्पर्शिता तिने मी मुग्ध झालो,
दिवसापणी चांदण्यात नाहून गेलो.