Friday, November 2, 2012

सजलेल्या स्वप्नांना तू सोडून जावू नको,
मी जागा नाही मला अजून जागवून जावू नको.

शोध मला तुझ्या अंतरंगी,
तिथेच माझा वास आहे.
जातो येतो जो श्वास तुझा,
तोच मी आज आहे.

जीवांशी न जीवनाची,
मला आता ओढ आहे.
क्षमा नको मला आता,
फक्त शिक्षेची आस आहे.



लिह कधी कधी पत्र माझ्यासाठी,
नको पाठवू नको मला सांगू.
नको मला आठवू ,
लिहितानी फक्त माझ्या आठवाचे शब्द आठव.

काय मागावे मी तुझ्या कडे,
तू नेहमी रिकाम्याच आली.
मी सागर ओंजळ केली,
तू मात्र कोरडीच बरसून गेली.

कुठे मी जावू  कुठे न्याय मागू ,
आसवांचे मोल कुठे मोजून पाहू.
न कळे मला, काय मला झाले,
हरवून सर्व काही, का मी काहीच हरलो नाही.


सांडतील जेथे आसवे माझी,
तिथे प्रीतीची सदैव बरसात होईल.
बहरत राहील प्रीत माझी,
अन तुही मला विसरून न जाई.





संधीग्ध भाव होते तुझे,
द्विधा तू  प्रीतीत माझ्या.
न  सांगता मी सांगितले,
का न कळले तुला.

माझिया प्रीतीत तू,
मंत्र मुग्ध व्हावे.
सुकलेल्या वेलीस ह्या तुझ पाहता,
प्रेमरूपी फुल यावे.

डोळे माझे रूप तुझे,
आसवांचे कितेक झरे.
प्रत्येक थेंब तुझाच सखे,
अन तुझे हि गाल का आता ओले.

तू दूर सारून मला,
कशी आज वर हसली.
चांदणी बनुनी आभाळी,
का नाही तू माझ्या अवकाशी रुजली.