Monday, May 30, 2011

मुक्तमनाने श्रावणसरी,
अंगावरती घेवू,
दे हातात हाथ माझ्या ,
चाल स्वप्न वाटावे अश्या नगरीत जावू.

भेटण्यास तुला मन,
ओसंडून वाहिले,
आज एका झर्याचे मिलन नदीस जाहले.

अदलाबदली हृदयांची आज आपण करू,
माझ्या प्रेमाची तळमळ, देव करो तुला हि कळू.

आज अचानक सखे तू का रुसली,
श्रावण धारांमध्ये तू का नाही माझ्या सोबत भिजली?

ओठांवरती तुझ्या,
प्रेम गीत माझे येवू दे.
ओलेचिंब रूप तुझे या माझ नयनांना पाहू दे.

एकटीच का ग तू आज अशी उभी,
बघ जवळ घेवून मला क्षणभर,
होईल प्रीत स्पर्श तुझ्या हि उरी.

ग्रीष्मात गुलमोहराच्या फुलांनी आज हिरवी पालवी लपली,
सहवासात तुझ्या प्रिये प्रीत माझी फुलली.

हृदयात माझ्या आज पावूस बरसला,
मन मोराने सप्तरंगी पिसारा फुलवला.

सांजवेळी मावळतो आहे तो रवी,
प्रीत तुझी सखे मला रोच त्याच्या जागी सायंकाळी जाली.

तू परत भेटणार नाही,
हे मला माहित आहे.
तुझ्या त्या हास्याची उमटलेली छाप,
आता फक्त माझ्या हृदयावर आहे.






थेंबा थेंबा ने बनतात मेघ सरी,
तुझी आठवण प्रिये, फुलवी श्रावण कळी.

पावसाचा थेंब बनून, 
तुझा स्पर्श सखे करू दे.
ओले चिंब हृदय तुझे,
माझ्या प्रीतीने भरू दे.

समजून घे प्रीत माझी,
नाहीतर थांबेल श्वास माझा.
आठव तुज मनाला,
भिजलो होतो आपण मागील श्रावणाला.

निळे सावळे नभ हे,
आज बरसणार आहे.
हाती हाथ घेवून तुझा
प्रिये आज मी जगणार आहे.

माळरानावरील फुले,
तू नसताना नाव तुझेच घेतात,
तुझ्या आठवणीत ते,
तुझाच सुगंध देतात.

स्वप्नाच्या पालखीत तू सावरून बसलीस,
हृदयाच्या घरट्यात माझ्या तू लाक्षिमी ची पाऊले टाकलीस.

आता तिच्या विना नयनांना माझ्या आसवांचे सुगावे लागले,
गीत गाता प्रीतीचे कंठ माझे दाटले.

हसणाऱ्या फुलांना अजून तुम्ही हसू द्या,
खलखलणाऱ्या प्रीत झर्याला,
हृदयात तुमच्या विरू द्या.

आकाश भरून न्हीघाले चांदण्यांनी आज,
प्रत्येक चांदनित मला तुझ्या चेहर्याचा भास.

पारिजातकाचा सुगंध दूर वर पसरला,
तुझ्या प्रीतीत सखे, आपण लावलेला मोगरा श्रावानापुर्वीच मोहरला.

सप्तसुरांनी  माझ्या रूप तुझे सजू दे,
इंद्रधनुचे रंग तुझ्या मेह्न्दीत रचू दे. 

श्रावण धारांचा  प्रत्येक थेंब तहानलेला,
सखे प्रेमात तुझ्या जीव माझा भेभांलेला.
तुझ्या विन हे जीवन अर्थहीन आहे,
तुझ्या काही आठवणीच आता ह्या जीवांच्या जीवन वाहिन्या आहेत.

नव पालवी फुटता,
बहरून जातात झाडे अन वेली,
हे दृश्य पाहून,
माझ हृदय गाते प्रेम गाणी.

नयनांना माझ्या फक्त रूप तुझे भावते,
तुला जेव्हा बघत नाही मी,
तेव्हा स्वप्नात हि माझे नयन तुलाच पाहते.

प्रत्येक रंगाला स्वःताचे अस्तित्व आहे, तरी प्रत्येक रंगात रंग तुझा आहे,
म्हणूनच त्या रंगानाही आजवर रंग आहे.

आनंदघनाची  बरसात घेवून माझ्या जीवनात तू आली,
आठवणीची हिरवळ मात्र मागे ठेवून गेली.

मन माझे पाखरू व्हावे शोधात तुझ्या,
रणरणत्या उन्हात मघे आज बरसावे प्रीतीत माझ्या.

अबोल तुझ्या ओठांना हसू मला देवू दे,
दूर जरी जाहलो आज, मिलनाचे स्वप्न या नयनांना पाहू दे.



चारोळी..

मुखावर तुझ्या प्रीत लाजते,
तूच जशी नवशांती  भासते,
प्रत्येक नजरेला तुझ पाहताना,
त्याच्या हृदयाची तू स्वामिनी वाटते.

प्रेमाच्या वाटेवर चालना, घरे बरीच भेटली,
आपली म्हणावी अशी तुझीच झोपडी वाटली.

प्रेमाच्या वाटेवर चालताना प्रेम मिळेल अस वाटल होत,
जिच्या साठी झुरत होत मन तिने दुसर्यासंगे घर थाटल होत.

हसणाऱ्या तुझ्या ओठांना पाहून मन हि माझ हसाल,
बघून तुझ्या मोहक रुपाला मन माझ फासल.

हवेचा एक स्पर्श होता , 
वाटल तुझ्याच प्रेमाचा स्पर्श झाला,
हे प्रिये आजवर तुझ्यासाठीच,
माझा जीव झुरत होता.

गुलाबी कळी सारखे तुझे मुख,
तुझ प्रीतीचा सुगंध माझ्या हृदयात,
ह्यातच माझ्या जीवनाचे सुख.


चारोळी..

तुझा मोहक चेहरा पाहण्यासाठी ,
रोज मी व्याकुळ असतो.
आणि त्यास हाहात धरताना,
त्या पुढे चंद्र हि फिका पडतो.

नाही करणार प्रेम असे जरी मी म्हणालो होतो,
ये प्राण प्रिये तुझ्या प्रीतीत, मी कधीच बुडलो होतो.

माझ्या हृदयाच्या प्रत्येक कनंकनावर प्रिये तूच राज्य केल,
तुझ्या विना जीवन माझ नाविक नसलेल्या नावेसारखे वाहत गेल.

तू बघितलेस माझ्याकडे फिरवून केसांवरून हाथ,
तुझ्या प्रेमाची पडली माझ्या हृदयावर छाप.

तू जशी संगमरवरी मूर्ती भासते,
परंतु त्या निर्जीव मूर्तीचे हि तूच तेज भासतेस.

प्रत्येक श्वासात साठवून ठेव मला,
परत मी जवळ असेल नसेल.
जात असलो दूर जरी मी ,
प्रतिबिंब बघताना आरश्यात तुला,
नयनात तुझ्या माझीच प्रतिमा दिसेल.



Sunday, May 29, 2011

तू ..........

इंद्रधनूप्रमाणे तू मज आयुष्यात आली, 
अन प्रीतीचे अनेक रंग उधळून गेली.
प्रत्येक त्या रंगला मी मनात ठेवलय,
प्रीतीला तुझ्या मी प्रिये जीवापाड जपलाय.
प्रत्येक सांजवेलेला आठवण तुझी,
भेभान मन माझे करून गेली.
निद्रा हि माझी आता,
माझीच साथ सोडून गेली.
रात्र जावी म्हणून मी हि आता ताऱ्याना मोजतो,
प्रत्येक तर्यात मला तुझाच चेहरा दिसतो.
हृदयात साठलेले मोहक रूप तुझे,
व्याकुळ नयनांना हवे आहे एक अंतिम दर्शन तुझे............

जीवन

आवलतो जितकी मी मुठ,
ओघळली रेत तितकीच हातातून माझ्या.
अन विसरतो जितका तुझ,
आठवतो माझाला चेहरा तुझा.
क्षण प्रत्येक तुझ सोबतचा,
वाटे माझ अमृतरूपी उसवाचा.
प्रीतीत रंगुनी उधळले जितके रंग तू,
उरले आहे जीवन रंगीत तितकेच माझे आता.
सतत आठवे हसरा चेहरा तुझा,
त्या नयनातून पडणार्या असवांबरोबर आता.
परत ये फिरुनी जीवनात माझ्या,
कि तुझ विन आहे हे जीवन अधुरे माझे माझ्या प्रीतफुला. 

Wednesday, May 25, 2011

मला वाटते आता मी लिहिणे सोडून द्यावे कारण माझ्या शब्दांमध्ये ती जादूच राहिली नाही. जेव्हा मी लिहायचो आणि तू तास अन तास वाचत बसायची, अस आज काल होतच नाही. आता तुला हि वेळ मिळत नाही आणि मलाही वेळ मिळत नाही. तू तुझ्या जगात खुश असशील आणि मी माझ्या असे शब्दांना वाटते म्हणून कि काय ते हि आज काल मला सुचत नाही. खूप प्रयास करतो मी तुला विसरण्याचा अन ह्या शब्दानाही, पण नेमके विसरता विसरता तुम्ही आणिखी आठवतात. डोके गरगरते आणि मन मात्र तसेच निस्तेज होऊन बघते. पण हे मी का सांगतोय माफ कर का लिहितो आहे कारण न तुला माझ्या शब्दांची परवा न माझी. तू तुझ्याच विश्वात खुश आहेस आणि खुश राहो. पण ह्या शब्दांना कोण समजावणार कि तू, तू ती राहिली नाहीस. 

Monday, May 23, 2011

तू नसताना...

तू नसताना, 
मी हि वेडा, मनहि वेडे होऊन जाते.
तू नसताना,
आभाळसारे माझ्यावरती अश्रू गाळत जाते.
तू नसताना,
गंध मोगर्याचा हवेत उडून जातो,
तू नसताना,
निर्माल्यापरी सर्व सृष्टी मागे ठेवून जातो.
तू नसताना,
मी एकटाच बसून राहतो,
तू नसताना,
तुझ्याच शोधात मी हरवून जातो.
तू नसताना,
स्वप्नात तुला पाहतो.
तू नसताना,
पेटलेल्या हृदयाला विझवू पाहतो.
तू नसताना,
सुकलेल्या नयना मी अश्रुनी ओलावतो.
तू नसताना,
तुझ्याच आठवणीना मी उराशी कवटाळतो.
तू नसताना.......



Friday, May 20, 2011

मनातील वादळ...

माझ्या लिहिलेल्या शब्दांना आता कुठलाच अर्थ उरला नाही,
तू नाही जवळ म्हणून आता कुठल्याच फुलांचा मला सुगंध येत नाही.
आकाशातील इंद्रधनू हि आता बेरंग झाला आहे,
अन बरसणाऱ्या मेघांबरोबर माझे हृदय क्षणोक्षण जळत आहे.
वास्तविकता मला कळत नाही असे नाही,
पण तू मला विसरली हे पटत नाही.
रोझच तुला आठवतो,दुसरे आता काही काम नाही.
तुला न आठवता माझ्या हृदयाचे एक हि स्पंदन होत नाही.
स्वप्नानाही आता माझ्या तुझी ओढ असते,
मला झोप येत नाही म्हणून स्वप्न हि माझ्या वर रुसते.
विचारांचे थैमान डोके हलवून जाते,
तुझ्याच ध्यासाने मन अगदी व्याकुळ होते.
सांग तूच आता कसा तुज विन जगू,
ह्या उठलेल्या मनातील वादळांना मी कसे शांत करू.

Wednesday, May 18, 2011

तुझ्या वाटेवर

हे सांग मी तुला कस विसरू, 
ना थांबणाऱ्या ह्या हृदयातील वादळाला कसा मी शमवू.
तू तर अशी मधेच सोडून गेली,
हृदयाची तार माझ्या तू तोडून गेली.
सावरतो मी रोज मला,
पण हृद मला साथ देत नाही.
अन मेंदू अन मनाच्या लढाईत,
आज काल कोणीच जिंकत नाही.
हि अशी अवस्था मला माझी,
आता पाहवत नाही.
प्रिये तुझ्या विना एक हि क्षण,
मला आता राहवत नाही.
तुला सांगतो हे मी रोज,
पण तू ऐकतच नाही.
अन माझ्या हृदयाच्या वेदांनावर,
तू कधी फुंकर घालतच नाही.
माझ्या ह्या भावना मी तुझ्या साठीच मांडतो,
तू एकदा मला भेटावे म्हणून मी तुझ्या वाटेवर नयन लावतो. 

Saturday, May 14, 2011

तुझ्यासाठी...

तू कितीही रागावली माझ्यावर,
तरीहि माझ्या प्रत्येक स्पंदनात तुझेच नाव आहे.
मिटलेल्या पापण्या जरी मी,
तरीही रूप तुझेच या नयनात आहे.
सोडून तुला मी कसा जगणार,
तुझ्या विना या जीवनाला मी जीवन कसे म्हणणार.
सोडून जन रीत मी आता जगणार,
तुझ्या साठीच प्रिये मी या जगाशी आता लढणार.
हरू नको देवू फक्त आता गंध आपल्या त्या भेटीचा, 
कि तुझ्याच नयनात आहे स्वर्ग माझ्या प्रीतीचा.
कसा जीव माझा जडला तुझ्या वरी हे मला समजेना,
अन तुझ्या विन एक क्षण आता मला करमेना.
मी नाही म्हणणार कि तूला मी विसरून जाईन,
पण हो, तू जर म्हणाली तर मी हे जग सोडून नक्की जाईन.

Wednesday, May 11, 2011

असेच दूर वर चालत जाताना हिरव्यागार गवतात एक शुभ्र कळी दिसली,
अलगद स्पर्श करताच ती गळून पडली.
खूप दुख: झाले का मी स्पर्श केला?
ती सुखी होती तिच्या जगात का मीच तिचा नाश केला?
तिचे जगणे मी का व्यर्थ केले, कि तिला आज मी त्या एकांतातून मुक्त केले.
खूपच वाईट वाटले अन जरा पुढे होताच एक काटेरी झुडूप दिसले.
त्यावरील काटे पाहून मन शहारून गेले,
स्पर्श तर दूरच पण पाहणे हि आता वेदनादायक झाले.
मनात विचार आला कि ती अशी सोडून गेली,
अन जे काही उरले आहे तेही किती रुक्ष आहे.




Sunday, May 8, 2011

तुझे प्रेम

सोडून जाताना तुला अन तुझे गाव,
माझ्या हृदयावरती आहेत तुझ्या प्रीतीतले काही घाव.
विसरून तुज मी परतत आहे आज,
नयनात घेवून कितेक अश्रुंचे पाट.
आलो होतो ज्या वाटेवरून,
तीच आज परकी झाली.
माझीच प्रीत आज माझ्यापासून खूप दूर गेली.
वसंतातील प्रत्येक पाऊस तुझ्या आठवणीचा,
मी मात्र एकटाच आज ह्या घडीला.
एकांतातील हे दुख: मी कसा सहन करणार,
तुझ्या संगतीतील प्रत्येक क्षण मी कसा बरे विसरणार.
तुझा चेहरा अजून हि नजरे समोर आहे,
अन प्रेम भाव माझ्या मनात तू कोरले आहे.
आता सर्व बंध मी तोडू पाहतो आहे,
तुझीच ओढ मात्र मला तुझ्याकडे खेचत आहे.
कसा मी आता राहू कळत नाही मला,
तू अन तुझे प्रेम का सदैव जाळतात मला.



 



Saturday, May 7, 2011

मेघ आणि तू

Lev Tsimring: Hope
Add caption
कुठून आले हे मेघ आणि किती आज हे सरसावले,
तू येणार म्हणून कि काय आज ते बेभान होऊन बरसले.
तुझ्या येण्याच्या आनंदात मी हि नाहून गेलो ,
छत्री सोडून मी आज नकळतच पावसाच्या थेबांशी लढत गेलो.
प्रत्येक थेंबाचा स्पर्श जणू तुझाच स्पर्श वाटत होता,
अन अंगावर माझ्या प्रत्येक थेंबा गणिक मोहर येत होता.
त्या वातावरणामध्ये तू आणि तुझीच आठवण,
मनावरती हजार वादळांचे आक्रमण.
मातीचा तो गंध मला धुंध करून जात होता,
तुझ्याच एक भेटीसाठी माझा जीव वेडा-पिसा होता.
रस्त्यावर साचलेले होते मेघांचे जल,
अन माझ्या हृदयात तुझ्या विचाराची हलचल.
मेघ हि आता बरसून बरसून दमून गेले,
तू येत नाही म्हटल्यावर ते माझ्या वरती जसे रुसून गेले.
सगळीकडे आता शांतता पसरली होती,
तुझ्या आठवणीत हृदय आणि भरलेले नयन मात्र रात्र भर बरसत होते.

Tuesday, May 3, 2011

स्वप्न

एक पाऊलही उचलताना उचलेना,
का एव्हडे ओझे लादले?
सुंदर माझ्या स्वप्नांना, 
का मी मनातच दाबले?
आयुष्यभर का सावल्यांचे,
ओझे मी वाहिले?
अमावास्यारूपी काळोखाने,
का जीवन माझे अंधाकारले?
हजारो स्वप्नांच्या,
माझ्या शव मी पहिले,
साठवलेल्या आठवणी सुकताना मी पहिल्या.
अश्रूंच्या थेम्बांवर आज वर त्या मी जपल्या.
सोडून तुला मी जगतो आहे,
प्रत्येक दिवस तुझेच स्वप्न नयनात बघतो आहे.

प्रीत

जसे तापलेल्या भूमीला जल दान मेघांनी द्यावे,
तसे आसुसलेल्या माझ्या नयनांना दर्शन तुझे व्हावे.
ओठांवरती तुझ्या सदैव नाव माझे राहावे,
माझ्या प्रीत चित्रात तूच रंग भरावे.
तुज संगे श्रावण सरीचे थेंब मी अंगावरती घ्यावे,
चातकाप्रमाणे मी आज तृप्त व्हावे.
घेवून हृदयात प्रीत तुझी सर्व तन मन न्हावून जावे,
तुझ्याच प्रीतीसाठी कंठातून माझ्या सप्तसूर निघावे.
चांदण्याच्या दर्शनाने चकोर आनंदित व्हावे,
भेटीने एका तुझ्या रिक्तपण मनातील माझ्या दूर व्हावे. 


मर्म

शब्दातील मर्म शोधताना,
हजारो शब्द मी वाचले,
कधी ते व्यर्थ,
तर कधी ते अनमोल भासले.
शोधताना मर्म नयनातील,
कित्येक नयन मी पहिले,
कधी ते व्याकुळ,
तर कधी उल्हासित मज दिसले.
शोधताना मर्म जीवनातील,
मी अंतरंगात डोकावून पहिले,
कधी ते उजाड वालवांटासारखे  ,
तर कधी फुललेल्या वसंतासारखे भासले.
शोधताना मर्म मैत्रीतील,
कितेक मित्र मी जोडले,
कधी ते जवळ तर कधी दूर दिसले.
शोधताना मर्म प्रेमातील,
सर्वांवर प्रेम मी करून पहिले,
कधी ते हसणाऱ्या ओठान्सारखे,
तर कधी ते लाजेने खाली जाणारया पापाण्यासारखे भासले.


प्रतिबिंब

मज नयनातील ज्या प्रतीबिम्बावर्ती मी प्रेम केले,
तेच आज अश्रू वाटे वाहून गेले.
उरले आहे आता फक्त कोरडे नयन,
अन उजाड हृदयाचे झोपडे.
रंग भारत होतो ज्यात मी,
तेच चित्र आज बेरंग झाले.
नयनांसमोर आता केवळ नीरस जग आले,
अन किती स्वप्नांचे शव इथे आज झाले.
परंतु, वाटत होते मना,
उमटेल प्रतिबिंब पुन: नयनात माझ्या.
कि तुलाहि कळेल माझ्यातील प्रेमाची भावना.




जीवनसंगिनी........

मधुर गीतांची ती सरगम,
कंठातून निघणारी ती साद,
हास्यातून फुलते तिच्या बाग,
पापाण्यावार्ती करता होते पूर्वेला पहाट,
केशातून होते जशी मेघाची बरसात.
ओठ जसे तिचे गुलाब पाकळी,
रूप जणू तिचे उमलत्या कमळाची काळी.
तिचे रूप भेभान करून जाते,
हृदयातील वादळाला तीच शांत करून जाते.
ती लावण्यमूर्ती, तीच प्रिया,
तिच्या सहवासात प्रत्येक क्षण उत्सवाचा.
ती आणि तिच्या त्या आठवणी मनाला वाटते,
तीच आहे माझी जीवनसंगिनी........