Tuesday, August 30, 2011

कधी एकटी असताना मला आठव,
तुला जाणवेल कि माझ्या वेदना कश्या आहेत.
रोज तुला आठवताना,
माझ्या हृदयात किती यातना आहे.

सगळ्यांच्या मनाला मोडून एक मन मात्र मी जपल,
त्या मनाने मात्र मला कधी का नाही मानल आपल.
वाटते आता मी कोणाच कोणी नाही,
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही आता कुणा नाही.

तू हि संगे माझ्या

उमलताना प्रीत फुला हळूच तू लाजशील का?
मी पाहताना वाट तुझी तू अवचित येवून जाशील का?
रात्र रात्र मी जगताना तू चांदण्यामध्ये दिसशील का?
मिटता डोळे स्वनामध्ये सप्तरंग भरशील का?
मला येता आठवण तू हि तिकडे रडशील का?
साचता पाणी नयनात माझ्या ओंजळीत थेंब धरशील का?
होता हृदय कोरडे तुझविन पाऊस बनून पडशील का?
मी तुला पाहताना तू मला हि पाहशील का?
नयनाच्या खेळात तुही जरा रमशील का?
जाताना मी दूर कधी तू हि मला थांब म्हणशील का?
विचारतो मी तुला ते तू कधी तरी मलाही सांगशील का?
तुझ्या हृदयाच्या स्पंदनांवर तू नाव माझे कोरशील का?
साथ मागतो मी जन्माची तू हि संगे माझ्या चालशील का?

Sunday, August 28, 2011

माझ्यातलं गाव तू सून केल,
आठवणीच भंगलेल देवूळ फक्त माग राहुन गेल.
त्या देवळात अजून हि तुझीच मूर्ती आहे,
रोझच इथे आता तुझ्या आठवणीची आरती आहे.

माझ्यातला मी हरवून तू झाली आहे,
तुझ्यातला मी मात्र आता हरवून गेला आहे.
तू तू नाही राहिली आता, अन मी न माझा,
दुरावले नाते का न कळे माझ्या मना.

तिच्या असण्यात माझ मी पण हरवत,
माझ्यातल्या तिला मग माझ असं जाणवत.
ओलावत मन माझ,
जेव्हा तिच्या नयनाच आभाळ पाणावत.


Thursday, August 25, 2011



भारावून जाते मन होते पिसाट पिसाट,
डोळ्यांच्या वाटेवर मग थेंब अफाट.
साठवता साठवता साठले आठवणीचे आभाळ,
का तिला कळतच नाही हे माझ्या मनातील तुफान.



ओळखलस का मला मी तोच जो तुला आवडायचो,
तुझ्या नयनातील थेम्बाना अलगद हातावर झेलायचो.
कुठे हरवलेस तू दिस कुठे सोडले ते क्षण,
तू असते एकटीच आता, मी हि एकटाच असा सुन्न.



तुझे तुला ठाव का तू अशी वागली,
मनातील भावनांची तू न कदर जाणली.
खेळ होता तुझ्यासाठी तो पण बाजी मी हरली,
मोडला सर्व डाव आता न कुठलीच आता आस राहिली.

Wednesday, August 24, 2011

जीव जडतो जेव्हा आभाळ दाटून येते,
तिच्या हर एक अदेमधून मुसळधार बरसात होते.
मी मागत राहतो तिला मग प्रेमाचे दान,
ती हि हसते, जेव्हा माझ्या प्रीतीला येते उधान.




Twilight Night Wallpaper
ती अशीच एक रात्र मंतरलेली,
नकळतच तुझी एक आठवण मोहरलेली,
पाहता स्वप्न तुझे नयनात,
अलगद ती तुझ्याच सहवासात सरलेली.

Monday, August 22, 2011

जाताना दिसल्या पाउलाच्या खुणा त्या ओल्या रेतीवर,
ती रेत होती कि हृद्य हे मात्र अजून कळले नाही.
एकाच लाटेसरशी मात्र सर्व काही वाहून गेले,
उजाड सृष्टी हृदयाची मागे ठेवून गेले.
तीरावरती उभे राहून आता आपल्याच उध्वस्त हृदयाचे चित्र तरी कसे पहावे?
या परीच त्या हृदयापासून आता मी दूर जावे.

ती हसता हसता अचानक गप्प झाली,
मावळतीच्या सूर्यापरी आता शांत झाली.
मी आवाज देत राहिलो,ती मात्र मुकी झाली,
माझ्या प्रीत अंगणाला अशीच सोडून गेली.
तिच्या मागून गेलेत कित्येक श्रावण ओस,
पडून जलधाराहि हि भूमी कोरडीच राहिली.
तिला माहित नव्हते का हे, ती अशी का वागली,
जाताना दूर, का नाही तिने माझ्या नयनातील प्रित पहिली.

ती जलधार आता कोरडीच वाटू लागली,
भिजूनही तिच्यामध्ये प्रित माझी सुकीच राहिली.
तिच्या सहवासात मी ओलाचिंब झालो,
मात्र हृदयाची भूमी थेंबा थेंबासाठी त्रासली.
मन भरून यावे इतके का तू मला आठवावी,
साचून ठेवावी नयनात तुला तर तू अश्रूवाटे का वाहत जावी.
भरभरून यावे मन माझे मग, 
ह्या भूतलावर माझ्या अश्रूंची आज बरसात व्हावी.

माफ कर मला मी उगाच तुझ्यावर जीव लावला, 
माहित होते हे तुटणारे स्वप्न तरी उगचं डोळा लावला.
ना आठवावी तू म्हणत तुलाच आठवत गेलो,
स्पनदनंच्या हुंदक्यांना मी हसत सामोरे गेलो.

पहाटेच्या रम्य सकाळी सोडून मी उगचं जागा झालो,
तुझ्या आठवणीच्या गुंत्यात पूर्णच बुडून गेलो.
नाही मझला माझे भान आता,
हे स्वामिनी तुझ्या हृदयातील मी एक दास झालो.

वाट पाहण्यात जाई हा जन्म सारा,
आसवांच्या ओलाव्याने भिजला सर्व नयनांचा किनारा.
तो मानतच नाही आणि उभा करतो मला पुन्हा .
सर्व विचार मोडून माझे, निर्णय घेतो का आता माझ्या मना?
मी हि नाही विसरलो अन तुही नाही विसरला अजून त्या क्षणा,
सहवासातील तिच्या अन माझ्या आहेत हृदयावरती अजून काही पाऊलखुणा.

Friday, August 19, 2011

कधी पडणारा  पाऊस आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय पहिला असेल तर त्या पडणार्या पावसाच्या प्रत्येक थेम्बगानिक मन अजून भरून येते अन नकळतच त्या पावसालाही ओले करून सोडेल अशी बरसात मग या नयनातून होते. कधी एकदा जरी प्रेम केल असेल तर दुसर्याच्या प्रेमाची किमत कळते अन त्याच्या वेदनांत आपल्या वेदनांची हलकीच जाणीव होते. 

Thursday, August 18, 2011

तू येत नाहीस पण तुझ्या आठवणी मात्र सतत येतात,
तुझ्या पेक्षा आता मला त्याच जास्त प्रिये प्रिय वाटतात. 
आसुलेल्या नयनातून काही मोती सांडतात,
साठवतो मी ओंजळीत जेव्हा तुझीच प्रतिमा दावतात.

ती तिच्या स्वप्नाशी अशी कशी बेईमान झाली,
प्रीतीला माझ्या भूलवून अशीच का गेली?
साथ देणार होती जी मला, तीच का दूर झाली,
समजूनही माझ्या भावनांना ती का अशी आज निष्ठूर झाली.

मला माहित आहे माझ्या नकळत तू मला पाहते,
मी नसताना तुही माझ्या आठवणीत हरवून जाते.
स्वतः दूर राहून माझ्यापासून तू अविरत जळत राहते,
मी हि तसाच आहे ग इथे, हे तुही जाणते,
माझ्या भावांना तू समजूनहि मग का अशी अलिप्त राहते.

पाउसाचा नवीन अनुभव

नेहमी पेक्षा पेपरवाला आज लवकर आला होता, कि मीच आज उशिरा उठलो होतो? असो आज चहा पिताना हातात ऑक्सिजन ची पुरवणी होती. सहसा मी पेपर मधील सर्व लेख वाचत नाही परंतु आज गोष्टच वेगळी होती. माझा आवडता पाऊस आणि त्याच्या सोबतच माझ्या मित्रांचे अनुभव. मग मी सव्तःला रोखूच शकलो नाही. एक एक करून सर्व लेख वाचत जात होतो. प्रत्येक शब्दागणिक मनात पाऊस दाटत होता. मग तो लेख कुणी आणि कोणत्या अनुभवातून लिहिला हायचा जरा सुधा विचार ना करता फक्त एक न एक शब्द मनात साठवत होतो आणि माझ्या हि काही आठवणी त्यात आठवत होतो. आज आमचा इकडे पाऊस नाही पण मनात खूपच मेघ दाटून आले आहेत, आता घरात असल्याने फक्त बरसात मात्र होत नाही. धन्यवाद टीम ऑक्सिजन मला आणि माझ्या सारख्या माझ्याच मित्रांना पुन्हा पाउसाचा नवीन अनुभव दिल्या बद्दल. 

Wednesday, August 17, 2011

कधी कमळाच्या पानावरील दवाला बघितले आहेस का तू, त्याप्रमाणे तुझे अन माझे नाते आहे. जेव्हा ते दव पानावर असते तेव्हा त्या कमलाच्या पानाला अनोखेच सौवन्दर्य प्राप्त होते. तसेच काही माझे आहे जेव्हा-जेव्हा तू माझ्या सोबत असते तेव्हा-तेव्हा माझ्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त होतो. 
आपण जीवनात कधी ना कधी घेतलेला अनुभव आणि त्याच्या त्या आठवणी सदैव स्मरणात राहतात, जसे कि, उन्हाळ्यानंतर आणि पावसाच्या आधी खूप गरम होत असते जीव नको नकोसा होऊन जातो आणि एके  दिवशी अचानक बाहेर असताना पावूस सुरु होतो, सगळीकडे तापलेल्या त्या धरणीचा सुगंध दरवळतो आणि सोबतच आपल्या शरीरावरहि त्या गार-गार थेंबांची बरसात होत असते ...कसा सुंदर अनुभव असतो ना. तसाच थंडीच्या दिवसात पहाटे फिरायला कधी गेला आहात ...जर गेला असाल तर आपणास माहीतच असेल वरती सगळीकडे धुके आणि पायाखाली हिरवे गार गवत आणि त्यावर साठलेले  दवबिंदू ....त्यांचा तो पायाला होणारा स्पर्श ....कसे मोहरून टाकणारा अनुभव असतो ना ....अश्याच अनेक अनुभवातून जीवनातील सुंदर सुंदर घटना क्रम आणि त्याच्या सुंदर आठवणी बनत जातात.....तसाच अनुभव आपणास प्रेमातही येतो...हे सर्व अनुभव आपल्याला पुस्तकात किवा गूगल वर सापडत नाही हे स्वतःच अनुभवावे लागतात...so go for it...

Tuesday, August 16, 2011

पाऊस सुरु झाला कि मन पावसात भिजण्यासाठी आतुर होते, पण आजारीपडण्याची भीती आणि लोक काय म्हणतील ह्या लाजेने बर्याच वेळेस आपण त्या सुंदर अनुभवापासून दूर राहू पाहतो पण आपले मन आपल्याला त्या पावसात ओढतच नेते ना. तसे काही प्रेमाचे आहे, प्रेमात कितीही यातना झाल्या, कितीही दुख वाट्याला आले, कितीत हि अश्रुनी बलिदान दिले तरी आपण प्रेम करतोच.....प्रेम हि भावनाच अशी असते.

Monday, August 15, 2011

ती अशीच हसून जायची,
मी मात्र दिवस दिवस त्या हास्याचे कारण शोधत राहायचो.
आपल्याच मनाला मी तिच्या मोहात सोडून जायचो.
मी दुसरीकडे आणि मन मात्र तिच्यापाशी,
भलताच हा खेळ न्यारा, का माझी स्पंदने वाढवी.

                                       

 खूप जलधारा आज येवून जाऊ दे,
 माझ्या अश्रूनही त्यात आज नाहून जाऊ दे.
 भिजलेल्या ह्या सृष्टी बरोबर आज माझे मन हि धुवून जाऊ दे,
 नको तो ध्यास मला नको त्या आठवणी,
 बरा आहे मी असाच तुझ्याविना अतृप्त जन्मी.

Thursday, August 11, 2011

नजर

नजर बोलत राहिली शब्द मात्र मुके झाले,
तिच्या नयनातील भाव माझ्या हृदयावर काही घाव करून गेले.
कधीं कधी माझ्यावाटे वर ती उभी रहायची,
मी येताच ती हि पटकन हसायची.
असे बरेच दिवस कधी मी, कधी ती त्या वाटे वर भेटायचो,
आम्ही नसताना, ती वाट हि आता आमची वाट पाहू लागली.
एके दिवशी तिचा तो स्पर्श नकळत झाला,
माझ्या ह्या जन्माला मी तेव्हा सलाम केला.
आज ती नाही माझ्याजवळ पण तिच्या आठवणी आहेत,
नसताना हि ती तिचा आभास ह्या उरी आहे.

Wednesday, August 10, 2011

ते घनही गर्जून जातात,
मी पावसाची जेव्हा वाट पाहतो.
मनसोक्त मग तो बरसतो,
आणि माझ्या पेटलेल्या भावनांना अलगद शमवतो.
दोघेही त्रासलेले आम्ही स्वतःला साथ देत असतो,
तो त्या जलधारांनी आणि मी माझ्या अश्रूधारांनी.
मस्त उनाड होऊन मग मी त्याला साथ देत जातो,
मनातील सर्व वेदना बाजूला सारून मी लहान होऊन जातो.
तो हि मला मग मस्त साथ देतो साऱ्या सृष्टीला माझ्यासाठी भिजवून जातो.
विसरून सारे आम्ही बेभान होऊन जातो, सर्व जगापासून दूर असे एकटेच बरसत राहतो.

Tuesday, August 2, 2011

मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो तू नवी नवी भासते, 
मी जाणून घेतो तुला अन तू आणखीच अवघड होते.
तुझ्या लावण्याचा मी आता पुरता दास झालो.
तू व्हावी माझी म्हणून, मी आज काल खूपच हट्टी झालो..
ह्या श्रावणात मी पडणारा पाऊस, तू मस्त जलधारा,
निसर्ग हि आता बघ प्रीती आपल्या फुलून आला. 
तू बघतेस जेव्हा जेव्हा माझ्या कडे, मी विचलित होऊन जातो,
अन तुझ्या पुन्हा एका नजरेसाठी व्याकुळ होऊ पाहतो.
मी विचारतो माझे मला, कि तू का इतका तिच्यासाठी वेडा?
मनातून एकाच आवाज येतो ती नाही तर तुही नाही सदा.

तुला माहित आहे का तू इतकी सुंदर का दिसतेस, 
कारण माझ्या प्रत्येक सुंदर कल्पनेची तू मूर्त रूप आहेस.
का तू इतकी निरागस दिसते विचार मला एकदा,
कारण तू माझ्या प्रत्येक निरागस हास्याचे प्रतिबिंब आहेस.

तू मला जगण्याचे अजून एक कारण दिले,
निस्तेज माझ्या नयनांना तू आज पुन्हा जीवन दिले.
मी तुझ्या विना विझणार इतक्यात तू, मला श्वसन दिले,
शांत स्पन्दनाना तू आज पुन्हा छेडून दिले.

मी अन तो

कधी कधी मी वेगळा होऊन जातो,
मी माझ्यावरतीच शंका घेत राहतो.
स्वस्त बसता याची जाणीव होते,
कि मी माझ्यातच आता दोघे पाहतो.
मी प्रत्येकावर शंका घेतो,
तो प्रत्येकात प्रेम पाहतो.
मी उगाच घरातूनच पावूस पाहत राहतो,
तो मस्त कधी पावसात फिरून  येतो.
मी त्याला वेडे म्हणतो,
अन तो माझ्यावर स्मित करून पुढे निघून जातो.
मी उगाच चिडचिड करतो,
अन तो मलाच समजावत बसतो.
मी जीवनाला वैतागून जातो,
तो मात्र जीवनातील सर्व रंग उधळीत राहतो.
जे कधी कधी मला जमत नाही,
तो एका क्षणात तडीला नेतो.
तो असाच राहावा म्हणून मी प्रयत्न करत राहतो,
मात्र ह्या सर्व व्यापात मी त्याला हरवून बसतो...