Friday, April 29, 2011

तिची ती काही पाऊले....


झनकार तुझ्या पाउलांचा, हुळूवार किती झाला.
हृदयातील प्रेम गीतांचा, आता अंत जवळ आला.
तोडून सर्व बंध तू, एकटीच उडाली.
आपल्या प्रेमाचे पंख तू छाटून गेली.
मी आवाज देत राहिलो, तू न कधी परत वळाली.
स्वर माझे मुके झाले, तू मात्र एकटीच गात राहिली.
हास्याचे ते काही क्षण, तू उधळून गेली.
मी गोळा करत राहिलो, अन तू फक्त बघत राहिली.
हातातून सोडून तू हात, बंध तोडीत गेली.
एक एक बंधाच्या त्या कड्या,
माझ्या ओंजळीत तू टाकून गेली.
सुचले नाही मला शब्द कधी, तेव्हा तू शब्द बनून गेली.
अन त्या शब्दांनीही हि मलाच, प्रेम यातना देवून तू गेली.
ती तिचा विरह, मागे  ठेवून गेली.
माझ्या नयना मध्ये मात्र, गंगा भरून गेली.
अन ठेवून गेली परत,
 न परत फिरणारी तिची ती काही पाऊले.

Monday, April 25, 2011

तुला हरवून .....

तू रुसलीस अन माझे शब्द हि रुसले.
काही तरी लिहावे म्हणतो मी,
पण विचार सारे थकले.
तुझाच चेहरा पाहून,
हे लिहिण्याचे धाडस करतो.
चांगले असेल कि माहित नाही,
पण दोन शब्द पुन्हा तुझ्यासाठीच लिहितो.
वेळ कसा पटकन निघून जातो ना?
तू आणि तुझे संवाद हरवून किती क्षण गेले.
रोझच तुझा चेहरा आठवतो मी,
अन तूला कसकाय हरवली, म्हणून स्वतावर रागावतो मी.
किती नाजूक होते ते काही क्षण,
जे जपत आलो आहे मी.
तू मात्र विसरलीस,
ज्या काही माझ्या आठवणी तुला दिल्या होत्या मी.
किती सहज विसरतात काही लोक, आपल्याच हृदयातील भावनांना,
काहीच नाही वाटत का त्यांना त्या अश्या उध्वस्त करताना.

Saturday, April 23, 2011

काही तरी हरवून काही तरी मिळालाय,
काही तरी गमावले पण खूप काही मिळवलाय.
सोडताना परदेशी गाव मित्रानो तुम्हाला मागे सोडतोय,
आणि घराच्या ओढीने मी मात्र चालतोय.
जरी सोडले गाव परदेशी, नाही सोडली आपली मैत्री,
अजून हि तुमचीच ओढ आहे माझ्या मना भोवती.
कसे असतेना एकाच वेळेला दोन भावनांना अनुभवताना,
कुठे मनात आनंद तर कुठे दुख काही तरी मागे सोडताना.

Saturday, April 16, 2011

आज निरोप घेताना.....

आज निरोप घेताना एक उत्साह,
मन मात्र  उदास आहे.
ज्या काही आठवणी आहे मित्रानो तुमच्या,
त्याच आता माझ्या बरोबर आहे.
घराची ओढ कधी संपली नाही,
पण तुम्ही घरापासून मी दूर हे जाणवू दिले नाही.
आपल्यातील तो स्नेह, भांडणे आणि ती मस्करी,
आणि न विसरता येणारी ती आपली यारी.
दर शनिवारी ती रंगलेली आपली मेहफिल,
आणि आणि शेजार्यांनी येवून केलेली ती किरकिर.
त्यातहि होती एक नवीनच मज्जा,
आणि परदेशात हि होती आपली एक अशी अदा.
रोजचा तो आपला नवीन उपद्याव्प,
आणि आपलाच सगळीकडे राज.
दर रविवारचे मंदिरातील जेवण,
आणि जेवानंतरचे ते झोपेचे काही क्षण.
खूप काही आठवणी आणि खूप काही गोष्टी,
नाही विसरता येणारे आपल्या मैतीचे ते रेशंम बंध.
धन्यवाद मित्रानो तुमच्या प्रेमासाठी, 
नक्कीच भेटू पुन्हा कुठल्यातरी वळणावरी !!!!!!



Wednesday, April 13, 2011

कुठे तू हरवलीस

कुठे तू हरवलीस प्रिये,
मला तू सापडत नाही.
आठवतो रोज तुला,
पण मी तुला विसरतहि नाही.
रोज तुझा ध्यास अन मन मात्र उदास.
कसे तुझ्या जवळ येवू, कसे तुला पाहू?
नयनातील अश्रुना कसे मी थांबवू.
प्रत्येक अश्रूच्या थेंबात तूच आहेस,
जमिनीवर पडताना हि तुझीच त्यांना आस आहे.
तुझ्याच साठी हे श्वास अजून चालू आहेत,
अन तू नाही तर आता ते हि व्यर्थ आहे.
सांग तूच प्रिये कसा मी जगू?
तू नाही जिथे तिथे मी कसा रमू?
व्याकुळ ह्या मनाचा प्रत्येक कण अन कण तुलाच स्मरतो,
ह्या धरणी वर प्रिये मी फक्त तुझ्याच साठी जगतो.

Saturday, April 9, 2011

खूप दिवस उलटून गेले...


खूप दिवस उलटून गेले, तूझी अन माझी भेट नाही,
मी वाटेवर तुझ्या आणि तू कधी येतच नाही.
मला विसरण्याचा प्रयत्न कर, असे तू मला किती समजावते.
मी प्रयत्न करतो, पण मन मात्र मानत नाही.
तुझ्यासाठीच धड धड होते दुसरे आता कोणी नाही.
एकच वचन दे फक्त मला,
जरी मला विसरलीस तरी प्रेमाला माझ्या विसरू नको.
जरी सजवली मेहंदी दुसर्याच्या नावाची,
तरी माझ्या त्या काही आठवणी हरवू नकोस.
स्वत: ची स्वप्न जपताना,
स्वप्नांना माझ्या त्या दुखवू नको.
मी सदैव तुझ्या आनंदासाठी जगलो,
तू एकदा तरी माझ्या आनंदासाठी जग.
वाट पाहणाऱ्या ह्या चातकाला,
मेघ बनून तृप्त कर.

Wednesday, April 6, 2011

तुझी काही पाऊले

सांगितले मी  विसरेन तुला,
पण खरच इतके सोपे आहे का विसरणे तुला?
जितका मी विसरण्याचा प्रयन्त करतो,
तितकीच तुझी आठवण येते.
डोळे झाकतो निराशेने अन तुझाच चेहरा समोर येतो.
चार चौघात असलो तरी त्यांना विसरून,
तुझ्याच आठवणीत रमतो.
खूप दुख आहे हृदयात या, तुला सांगू कि नको.
तुला सांगितल्यावर तुला हि दुख होईल कि काय,
म्हणून मी स्वतःच एकटा अश्रू बरोबर आज काल खेळतो.
खूपच उदास झाले जग माझे तुझ्या विना,
इंद्रधनुचे रंग हि फिके झाले माझ्या मना.
तूझ्या त्या काही आठवणींवर जगतो आहे,
तू जवळ नाही म्हणून स्वतःवरच चिडतो आहे.
तुझी प्रत्येक आठवण आता मला दररोज सतावेल,
अन मन आणि मेंदूच्या लढ्यात मीच हरेल.
जाणतो मी हि तुला खूप अडचणी आहेत,
पण माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे तर तूच आहेस.
मी अशा वाटेवर चालत आहे, ती कुठे जाते हे हि मला माहित नाही.
पण त्या वाटे वर तुझी काही पाऊले आहेत हे माझ्या साठी खूप आहे.

Tuesday, April 5, 2011

मैत्री

मैत्रीच्या फुलानाचा गंध कायम तसाच राहतो,
पाकळ्या जरी दूर झाल्या तरी फुल मात्र तेच राहते.
काळ निघून जातो पण,
हृदयात होणारी ती घालमेल मात्र तशीच राहते.
आठवणीचा प्रत्येक क्षण व्याकुळ करतो,
अन मैत्रीच्या त्या जुन्या नात्यांना पुन्हा आठवतो.

Sunday, April 3, 2011

तू अन मी

आज मला तू खूपच प्रामाणिक वाटते,
न सांगताही तू खूप काही सांगते.
न थांबता माझ्या सोबत दूर वर चालते,
मी थोडे दूर गेल्या वर हि तू मलाच शोधते.
सागर किनाऱ्यावर प्रत्येक माझ्या पाऊलावर पाऊल तू ठेवते,
अन लाडाने मला माझ्या कडेच मागते.
सतत माझ्या नयनात बघते,
अन मलाच माझेनयन कसे आहेत ते तू सांगते.
तू एकटीच किती बोलते,
अन माझ्याकडे बघून नुसतेच हसते.
प्रेमाने हाथ माझा हातात घेते,
अन हळूच ओठांची तुझ्या मोहर तू लावते.
नंतर निळ्याशार आकाशात मी पाहत राहतो,
अन तू त्या आकाशात हि मलाच पाहते.
जल धारा होऊन मी आता बरसू पाहतो,
अन तूच माझी धरणी तेव्हा होते.




प्रेमाची तहान

मी पाहिलेले ते एक स्वप्न,
अजूनही स्वप्नच आहे.
तुझ्या एका भेटीसाठी मी अजूनही,
तुझ्या वाटेवर उभा आहे.
तू दिलेल्या त्या गुलाब पाकळ्या मी अजूनहि जपल्या आहे,
सुकून गेल्या त्या तरी गंध मात्र तसाच आहे.
ते चांदणे आकाशातील साथीला आपल्या होते,
तू गेल्यावर तेच साथ देत आहे.
तिला हि माहित आहे मी तिच्या विना एकटा,
तरी ती नाही मानत मला आपला.
कधी तरी विचारते खरच का मी तुला आवडते,
आणि मी हो म्हणल्यावर ती उगाचच रागावते.
नाही जमत मला तुझ्या सारखे वरवरचे वागायला,
मनात असूनही, भावना मनात दाबायला.
एकदा तरी तू तुझ्या भावना मला सांग,
मला हि कळू देत कि तुला हि आहे प्रेमाची तहान.

Friday, April 1, 2011

दादा तुझ्यासाठी

सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
तू दिलेल्या प्रेमासाठी काय माझे अर्पण करू.
तुझा तो मायेचा हाथ आणि प्रेमाची साथ,
मी कशी विसरू, सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
प्रत्येक क्षण-क्षणाला मला तू दिली साथ,
नाही कधी सोडले तू मला एकटे रणरंत्या उन्हात.
सावली तू दिली, दिला मला विसावा,
स्वतः मात्र उभा होतास तू निखार्याच्या वनात.
सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
माझा प्रत्येक श्वास का न मी तुझ्या वरती अर्पण करू?
आई जेव्हा रागवायची, तूच होता माझा आधार,
अजून हि मी गहिवरलो कि येतात अश्रू तुझ्याच नयनात.
तू माझ्या साठी कष्ट करतच आलास,
मी थोडे काही केले तर तू समाधानाने सदैव फुलून गेलास.
तू न कधी रागावलास न कधी भांडलास,
प्रेमाचे झरे तुझे मात्र तू गंगे प्रमाणे माझ्या वर सांडलास.
सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
तू जपून ठेवलेल्या मला मी कसे तुझ्या वर अर्पण करू.
मला जरा लागले तर तू किती रडलास,
माझ्या प्रत्येक खोडीला तू न रागावता  हसलास.
आपल्यातील प्रेम न कधी तू कमी केले,
जमेल तितके तू सदैव सुख मला दिले.
असाच तू दादा माझ्या बरोबर राहा,
तुझ्या मायेच्या सावली खाली मला तू पहा.