Monday, September 5, 2011

अशीच अवचित आली समोर आज तू पुन्हा,
सोडून तुझा विचार मी जगत होतो जेव्हा.
वाटले मनाला बोलावे तुजपाशी काही,
पण तो धीर आता माझ्या मनालाही होत नाही.

तुला नसेल येत आठवण पण मला रोज येते,
तू नाही म्हणून तुला शोधण्यातच सर्व वेळ जाते.
तू अशीच आता झाली, 
रंग हाताच्या बोटावर ठेवून फुल पाखरागत उडून गेली.

मी लिहिलेल्या ओळींना आता माझाच आक्षेप असतो,
विचार वेगळे अन मी प्रत्येक्षात मात्र वेगळेच लिहितो.
शब्द अचानक मला दगा देवून जातात,
तुझा विचार नसतानाही तुलाच स्मरून जातात.