Thursday, March 31, 2011

मित्रांसाठी काही....

मी नाही हरवला ठेवा तो आपल्या मैत्रीचा,
अजूनही गोडच आहे मेवा तो आपल्या मैत्रीचा.
अजून हि आठवणीत आहे तो वेळ आपला पाउसताला,
अन तो काळ क्यानटीनमधला.
मित्रानो मी अजून हि जपला आहे तो दुवा आपल्या मैत्रीचा.
कट्ट्यावरील तो एक चहा आणि ते चार-चार तास,
अजून हि आठवतो मला आपल्यातील तो ध्यास.
ते प्रत्येक सन अन वार आपण साजरे केलेले,
घरापासून दूर असून हि सदैव आपण हसणारे.
एकाच मुलीला पाहून आपण सारे भांडणारे,
अन ती दुसर्याबरोबर गेल्यावर एकमेकां सावरणारे.
मित्रांसाठी काही लिहावे अस आज वाटले,
नयनाखाली अश्रू नकळतच दाटले.

Wednesday, March 30, 2011

ती अशी निघून गेली,
बघून माझ्या कडे एकदा.
वाटले मनाला,
फुलेले वसंत ह्या वाळवंटात आता.

कोकिळेच्या प्रत्येक स्वरात,
स्वर तुझाच ऐकू येतो.
प्रत्येक उमलणार्या कळीत,
चेहरा तुझाच मी पाहतो.

नझरेला नझर देताना,
तिची पापणीही नाही झुकली.
मनाने मज सांगितले,
हीच आहे प्रीत आपली.

समजून हि तुज,
मी नाही आजवर समजलो.
त्या तुझ्या झुकणाऱ्या पापण्यांचे,
रहस्य आजवर नाही उमगलो.


बघणारी ती तुझी चोरून नजर,
घायाळ माझ हृदय करून गेली.
स्मित हास्याने तुझ्या,
प्रीत वेल माझी बहरून आली.



फुलपाखराच्या प्रत्येक रंगात,
रंग तुझाच आहे.
जो वर तू मज जवळ आहे.
तो वरच माझ्या प्रीतीला गंध आहे.

                                                                         आंगणात कोसळला,
                                                                         आज श्रावणी झरा,
                                                                         प्रीतीत तुझ्या फुलालला,
                                                                         मज मन मोर पिसारा.
प्राजक्ताच्या सुगंधाप्रमाणे,
सुगंध तुझ्या प्रीतीचा दरवळला.
तुझ्या एका स्पर्शाने, 
माझ्या हृदयाचा गुलमोहर मोहरला.
                                                                           हसणाऱ्या तुझ्या ओठांना,
                                                                           अजून हास्य मला द्यायचे आहे.
                                                                           हृदयात माझ्या तुला ठेवून,
                                                                           स्वताला विसरायचे आहे.
Fast Water And Stones Mobile Wallpaperखळखळनार  पाणी ही,
तुझच नाव  घेत  होत,
माझ्या हृदयाचे गाव,
तुझ्या विना सून होत.

                                                     
 झुकणाऱ्या तुझ्या पापण्यांना,
 स्पर्श माझा होत आहे.
 बघ डोकावून नयनात माझ्या,
 प्रतिबिंब तुझेच आहे.





कधी आपल्या आपल्या संगे झुलणारा,
झुला आज एकटाच झुलत आहे.
विरहाने तुझ्या प्रिये,
हृदय माझे दीपका सारखे जळत आहे.

                            
सांग हे आसमन्ता,
तीच का माझी प्रीत आहे.
प्रेमिकांच्या जीवनात विरह,
हीच का तुझी रीत आहे.




Monday, March 28, 2011

ती

ती अशी उदास असली की माझ मन हि उदास होत,
तिच्या चेहऱ्यावरील हास्यासाठी सार आभाळ मग गोळा होत.
हुळूवार वारे ही तिला गुद्गुद्वून जाते,
अन तिचे एक हास्य पाहून मेघही मग बरसते.
तिच्या त्या स्मितासाठी मी काहीही करू शकतो,
पृथ्वीवरच  तिच्या साठी स्वर्ग आणू शकतो.
तिचा तो स्पर्श मला मोहरून टाकतो,
अन ती दूर गेल्यावर हि तिचा गंध माझ्या श्वासात असतो.
तिचे ते नाजूक पैंजण हुळूवर आवाज करतात,
जशी माझ्या हृदयाचे ते ठोकेच वाटतात.
तिची ती प्रत्येक अदा माझ्या मनात मी जपली आहे,
जीवनात तिलाच आता मानले मी आपली आहे.



Saturday, March 26, 2011

का?

खरच कळत नाही काय चुकले माझे,
कुणाला जीव लावणे हे काय पाप आहे?
वाईट फक्त इतके वाटते,
मला जे कळते ते तिला का कळत नाही?
हृदयाची स्पंदने अन हि तळमळ तुझ्या साठी आहे,
हे का मी तुला नव्याने सांगावे?
तुझा अबोला आता सहन होत नाही आहे,
हृदयाचा प्रत्येक कण अन कण अश्रू गाळत आहे.
ह्या दिवसात मी खरच आता अशांत आहे,
तुझ्या एका शब्दाची मला नितांत गरज आहे.
सोडून दे एकदा हे सर्व जग माझ्यासाठी,
आता संपत आली आहे जीवन घटिका माझी.
उशीर केला जर तू , मी जायचो दूरवर,
आणि तुझे अश्रू फक्त असतील तुझ्या नयानांखाली.
अन उरेल एकाच प्रश्न का? 
तो वृक्ष अजूनही आपल्या आठवणी सोबत उभा आहे,
मात्र आपल्या त्या आठवणी तू कधीच विसरून गेलेली आहे.
तुला पुन्हा पुन्हा आठवणी त्या सांगून मी आता खरच थकलो आहे,
काय माहित तूला माहित असूनही का तू अनोळखी बनत आहे.
आपल्यातील ती नजारानजर तो स्नेह तू हरवलास,
माझ्या भवनाचा पुष्प तू पायदळी तुडवालास.
माहित नाही मला तुला काय अडचण आहे,
पण माझ्या भावनांच्या ज्वालांवर तू तुझा दीपक पेटवला.
तू खुशाल जा आता मला सोडून,
कारण मी हि आता माझ्या सर्व हृदयाच्या वेदनांना कायमच संपवलं.


माझे हृदय

माझ्या तळमलनार्या हृदयाला का अजून छेडते आहेस.
न सांगताच का अशी दूर जात आहेस.
दररोज वाट पाहतो तुझी मी त्याच वेळेला,
आणि रोजच तू ती वेळ मुदाम चुकवतेस.
मी आपला वेडा तुझ्या साठी झुरतो,
तू मात्र मला वेडा समजून कि काय मला टाळते.
नाही कळणार तुला भावना माझ्या ह्या हृदयातल्या,
का कधी दगडाला पाझर हि फुटतो?
मी आता हताश होतो आहे,
तुझ्या विचाराने का कुणाच ठावूक मी भारावून गेलो आहे.
सांग तूच आता माझे काय चुकले तुला जीवापाड मी का ह्या साठीच जपले ?
 का ह्या साठीच जपले ?



Friday, March 25, 2011

एक यशस्वी पाऊल टाकण्यासाठी,
खूप मोठे अंतर चालावे  लागले. 
ह्या हृदयाच्या भावना त्या हृदयापरीयंत पोचण्यास बरेच वर्ष  लागले.
समोरासमोर भेटण्यासाठी कईक आयु गाळले,
आता कुठे मिलनाचा  योग येत आहे,
अन नयनातील निस्तेज सूर्य कुठे चमकत आहे.
एकच मागणे त्या परम्पित्या कडे आहे,
विरहाचा लव लेशही त्यांना परत लागू नये.

Wednesday, March 23, 2011

तो उभा एकटाच आहे तिच्या वाटेवर,
ती नेहमीच त्याला ठेवते एका आशेवर.
तो हि न थकता उभा राहतो,
दुबणाऱ्या सूर्याबरोबर उदास होऊन जातो.
हलकेच संध्याकाळी वारे वाहते,
तिच्या येणाऱ्या पाउलांच्या आवाजाने त्याचे मन मोहरून जाते.
ती आणि तो आता जगापासून दूर झाले,
चंद्राच्या साथीथ एकरूप झाले.


Monday, March 21, 2011

नाही मी जगा वेगळा पण जगात हि न उरलो,
तुझ्याच साठी प्रिये मी आजवर सतत झुरलो.
जे विसरलो ते स्वप्न मी पुन्हा पाहतो,
तुलाच आठवून मी ह्या चार ओळी लिहितो.



Monday, March 14, 2011

मैत्रीचा क्षण

पावसाच्या धारांनी,
कणाकणाला भिजवून टाकल.
आपण त्यांना सागावे मेत्री काय असते ?,
तर त्यांनीच आपणास सांगून टाकल.
जसा विजेच्या प्रकाशानंतर गडगडात ऐकू येतो,
तसाच कुणाचा सहवास आवडल्यानंतर मैत्रीचा बंध निर्माण होतो .
कितीही वादळनंतर सृष्टी जशी पूर्ववत होते,
तशीच मेत्रीच्या एका क्षनाने जीवन वाट सुकर होते.
जीवनात आपण विविध नाती थाटतो,
परतू मैत्रीचा एक क्षन मला अमृताचा थेंब वाटतो.  

आशा

दव होऊन मोत्यासारख चमकायच असत,
जीवनातील कळीसोबत फुलायचं असत.
अबोल असून हि खूप काही बोलायचं असत,
मनातील भावनांना समोर मांडायचं असत.
चंद्राच्या सोबतीने चांदण्यात भिजायचं असत,
तुझ्या भिजलेल्या अश्रुना पुसून तुला हसवायचं असत.

प्रेमाचा रंग

आकाशातून आल्यासरी,
भिजुनी गेले सारे अंग.
मनामनात बहरलाय,
एकच प्रेमाचा रंग.
मलीन पर्ण स्वच्ह झाली,
नवजीवनाची जशी सुरवात झाली,
गीत गाऊ लागले हृदयाचे पाखरू,
लाल चंदेरी प्रकाश पसरला.
वृक्ष हि लागले डोलायला,
फक्त तुझ्याच प्रीतीत हृदय माझे लागले झुरायला.

तूच माझी प्रिया

आसवांना तुझ्या कुठलाच रंग नाही ,
ओघळताना सुद्धा काहीच का बोलत नाही.
पापण्याखाली जसा समुद्र साठलाय,
काही तरी सांगण्यासाठी जणू तुझा कंठ दाटलाय.
समुद्रात त्या तुझ्या एक लाट उठू दे,
मनात दडलेल्या भावनांना ओठावरती येऊ दे.
नयनाच्या पापण्यावरती उठू दे,
त्या नयनरुपी आरशात प्रतिरूप माझे उमठू दे.
साठवून ठेव प्रीत माझी हृद्यात तुझ्या,
कि तुज पाहता मज वाटावे तूच माझी प्रिया .

Saturday, March 12, 2011



देखते है ये दिल कब तक दर्द देता है ,
शायद खुदा हमारी कभी न कभी दुवा कबूल करे.
मी चार चौघात असतानाही एकटाच असतो, 
सर्व दिवे विझल्यावर मी एकटाच जळतो.
वेळ वाढत जाते जशी तुझ्या दुराव्याची,
मी अधिकच बेचैन होतो,
कालोखातील काजव्याच्या प्रकाशात,
मी दूर एकटाच चालत जातो.
वाट संपत येते तरी पाय चालत राहतात,
अन वाट संपल्यावरही त्या वाटे वर नयन तुझी वाट पाहतात.


सागराच्या लाटाही नाद करत आहे,
तुझ्या आणि माझ्या गीतात साथ देत आहे.
विसाव्याच्या या क्षणात तू माझ्या बरोबर आहे,
विसरून या जगाला मी नव्या विश्वात हरवत आहे.
तुझे ते गोड स्मित मला मोहित करत आहे,
या सांज वेळेला तुझ्या प्रीतीत मी बेदुंध होत आहे.

Thursday, March 10, 2011

श्रावणातली ती पहिली धार अन मातीचा गंध नवा,
वेड लावतात हे सुंदर दृश्य जीवा.
आसामात हे भरून आले, संगतीला हि हवा,
बरसून जा आज नको त्रासु आपल्या चातका.

Wednesday, March 9, 2011

मी जपलेला आठवणी चा तो ठेवा आज माझ्या कामी आला,
तुला पाहताच ना मी माझा ना कोणी माझा राहिला.
ते दिवस आपल्यातील ना तो काळ मी विसरला,
का कुणाच ठावूक तू मात्र आपल्यातील तो स्नेह नकळत गमावला.

Friday, March 4, 2011

हरवलेल्या त्या काही....

जगातील प्रत्येक शब्द हा कोणी न कोणी कुठे न  कुठे वापरलेला असतो म्हून काय त्या शब्दाचे मोल कमी होत नाही. तसाच माणसाचे आहे, मानव जात (म्हणूयात आपण ) नेहमी नव नवीन नाते जोडत जातात पण म्हणून काय मग त्या जुन्या नात्यांचे महत्व कमी होते का? नाही ना. मित्रांनो सदैव आपण नवीन मित्र, नवीन नाते जोडण्याचा प्रयातानात असतो पण का मग जुन्या त्या इतक्या मेहनतीने बनवलेल्या( जोडलेल्या ) नात्यांना आपण इतके सहज विसरून जातो.
किती अथक प्रयत्न, मेहनत, प्रेम, आपुलकी इत्यादी. आपण पणाला लावून जे काहि मिळवतो ते किती सहज आपण काळाच्या ओघात सहज मागे टाकून जातो नाही का? असच बघा ना लहानपणी आई बाबा कडून हट्टाने घेतलेली ती खेळणी असू द्या कि मग छोटीशी पेन्सील असू देत घेताना व घेतल्या वरचा आनंद कधी विसरता न येणारा असतो पण आपण सहज तो विसरून जातो. मी म्हणत नाही कि हे सर्व आपण जाणून बुजून करतो पण हीच तर आपली मानवी सवय झाली आहे. त्या आठवणी आपणाकडून कशा सहज हरवल्या जातात ना?
इतक दूरच कशाला आपण आज काल इतके एकरूपी झालो कि आजू बाजूला काय चालू आहे ते पण बघत नाही, का तर कशाला उगाच दुसर्याच्या गोष्टीत लक्ष द्यायचे नाही तर उगाच आपल्या अंगलट यायचे. इतके का आपण एकरूपी ( कि भित्रे) झालो.
किती जणांना आपले सर्व जुने मित्र आणि मैत्रिणी आठवत असतील? आणि जरी माहित (आठवणीत ) असले तरी किती जन त्यांच्या संपर्कात असतील. का तरम्हणे तो खूप दूर राहतो, नाही ती तर मला फोने पण नाही करत, तो बघून ना बघितल्या सारखे करतो, अरे मी ऑनलाइन असलो तरी तो रेप्लाय देत नाही, अरे खूप दिवस झाले आता  तो मला ओळखत हि नसेल आणि अशीच किती तरी करणे पुढे करून आपण पळवाटा शोधात असतो आपल्या प्रेमाच्या मान्सानापासून दूर जाण्यासाठी आणि त्याच वेळेस नवीन मित्र बनवण्यासाठी खूप वेळ काढून, तास न तास त्या बरोबर गफ्फा मारून वेळ घालवतो (हसू येते मला, कारण मी पण हेच केले आहे काही प्रमाणात).
खूप काही असत आपल्याकडे सांभाळण्या सारख पण आपण नेमक तेच हरवून नवीन काही सापडत असतो.
बघू आता किती आपण जुन्या (हरवलेल्या ) गोष्टीना जपून ठेवू.............

अपेक्षा

पखं लेउनी पक्षांचे उचं भरारी मारावी,
तुझ्याच प्रीतीत  बुडुनीतुज प्रेमाची साद घालावी,
नयनात तुझ्या राहुनी हृद्यात तुझ्या शिरावे,
सांग प्रिये तुज वरतीप्रेम किती मी करावे ?
हतात हात घेऊन तुझा, क्षितिज्यापलीकडे फिरावे,
प्रेम  ग्रंथात का नाही आपले नाव कोरावे,
तहानलेल्या धरणीला मेघांनी जसे तुर्प्त करावे
तसेच तू तुझ्या प्रीतीने माझे हृदय भरावे

आठवणी

आठवणीने तुझ्या मन आतांकित होते माझे,
शांततेसाठी आणखी एक आठवण पुरेशी होते.
सायंकाळी एकटेपणा जाणवू लागतो,
व्याकुळ नयनाला फक्त तुझाच चेहरा आठवू लागतो.
पण आठवणीसाठीहि विसराव लागत,
तरी हि मनात तुज जपाव लागत.
अशावेळी मज तुझ्या त्या मोहक रूपाचे दर्शन व्हावे,
या नायकाला धरणीवरतीच स्वर्गाचे दर्शन व्हावे.

विरह

थेंब थेंब साठवून,आठवणीनी तुझ्या
सागर मी साठवला.
लाटे प्रमाणे उटून, भावनांनी माझ्या
हृदयाचा तठ हलविला.
ज्या व्रुक्ष्याच्या शाखेवरती झोका
स्वप्नाचा टांगला.
विरह रुपी वादळाने
तोच व्रुक्ष उलगून पडला.
सावरण्यासाठी धाव घेता मी,
बंधनाच्या या बेड्यांनी पाय माझा अडवला.
निरोप देताना तुला नयनाखाली एक अक्ष्रु नकळत अडखळला.