Friday, November 2, 2012

सजलेल्या स्वप्नांना तू सोडून जावू नको,
मी जागा नाही मला अजून जागवून जावू नको.

शोध मला तुझ्या अंतरंगी,
तिथेच माझा वास आहे.
जातो येतो जो श्वास तुझा,
तोच मी आज आहे.

जीवांशी न जीवनाची,
मला आता ओढ आहे.
क्षमा नको मला आता,
फक्त शिक्षेची आस आहे.



लिह कधी कधी पत्र माझ्यासाठी,
नको पाठवू नको मला सांगू.
नको मला आठवू ,
लिहितानी फक्त माझ्या आठवाचे शब्द आठव.

काय मागावे मी तुझ्या कडे,
तू नेहमी रिकाम्याच आली.
मी सागर ओंजळ केली,
तू मात्र कोरडीच बरसून गेली.

कुठे मी जावू  कुठे न्याय मागू ,
आसवांचे मोल कुठे मोजून पाहू.
न कळे मला, काय मला झाले,
हरवून सर्व काही, का मी काहीच हरलो नाही.


सांडतील जेथे आसवे माझी,
तिथे प्रीतीची सदैव बरसात होईल.
बहरत राहील प्रीत माझी,
अन तुही मला विसरून न जाई.





संधीग्ध भाव होते तुझे,
द्विधा तू  प्रीतीत माझ्या.
न  सांगता मी सांगितले,
का न कळले तुला.

माझिया प्रीतीत तू,
मंत्र मुग्ध व्हावे.
सुकलेल्या वेलीस ह्या तुझ पाहता,
प्रेमरूपी फुल यावे.

डोळे माझे रूप तुझे,
आसवांचे कितेक झरे.
प्रत्येक थेंब तुझाच सखे,
अन तुझे हि गाल का आता ओले.

तू दूर सारून मला,
कशी आज वर हसली.
चांदणी बनुनी आभाळी,
का नाही तू माझ्या अवकाशी रुजली.



 

Wednesday, August 29, 2012

श्रावणातील इंद्रधनू कधी, 
कधी सुगंध फुलांचा झाली,
दरवळत सर्वत्र तू ,
हृदयात माझ्या गंध सोडून गेली.

एकटे असताना मी,
ढग दाटते आठवणीचे,
पाणावतात नयन,
अन ओघळत्या थेंबात रूप तुझे.

Monday, August 27, 2012

जाईल मी सर्व सोडून तेव्हा तू हि रडशील,
ओघळणार्या नयनातील आश्रुना किती सावरशील.
प्रत्येक अश्रू माझी आठवण मागे ठेवून जाईल,
न आठवता हि तू,  तुला एक नवी आठवण देवून जाईल.

लिहीण्यासारख खूप काही होते,
पण मी तुझ्यासाठीच लिहिले,
शब्दांना मांडताना तुलाच,
मी मूर्त रूप मानल.

Wednesday, August 15, 2012

मन सावरून तूला बर जगता आल,
समजून भावनांना माझ्या,
तुला, पाणावलेल्या डोळ्यांना बघून माझ्या बर हसू आल.

मी जरी तिला विसरतो,
का हे मना तू तिचा ध्यास करतो.
झाले अनोळखी सर्व काही,
तरी आत कुठेतरी तीच वास करते.

शोध सुरु आहे अजूनहि तुझा माझ्या अंतरंगात,
तू मात्र मंत्रमुग्ध ह्या भर पावसात.
प्रत्येक थेंब तुझाच स्पर्श देतो आहे,
साठवलेल्या आठवांना नयनातून वाट करून देत आहे.

सरगम थेंबांची जरा ऐकून जा,
उतावीळ मनाला शांत करून जा.

मी माझ अस्तित्व हरवून बसलो आहे,
तुझ्या साठीच मी अजून झुरलो आहे.
नसतेस तू जेव्हा,
मी एकटाच या पावसात भिजलो आहे.

माझ्या उदास पनातही तू साथ देत होतास,
माझ्या आनंदातही तूच होतास,
मग असे आज काय झाले तू दाटून तर आलास,
मात्र अश्रूनि माझे नयन बरसून गेले.

मी जे गातो ते गीत आहे तू,
स्पंदनातून निघणारे संगीत आहे तू.
तहानते मन माझे जेव्हा,
बरसणाऱ्या पावसाचे थेंब बनते तू.

तुझ्यासाठीच मी तुला विसरणार आहे,
मन नाही मानत पण मी मानणार आहे.
सांडताना मोती नयनातून मी,
तुझ्या हास्यासाठी मी हसणार आहे,

Wednesday, June 27, 2012


का ग तुझ्या नयनाचे आभाळ अताच दाटल.
कुणी दिला तुला असा दुखा:चा वारा,
का ग तुझ अश्रुंच आभाळ फाटलं.
नसे तुला कुठलाच आज गंध,
का तू अशी बावरी सर्व तोडून बंध.

हलक्याच त्या सरी आज बरसून गेल्या,
तुझ्या आठवणी पुन्हा जाग्या करून गेल्या.
प्रत्येक थेंब मातीचा सुगंध वाढवत होता,
पेटल्या मना माझ्या तो शांत करत होता.

तिच्या शब्दातून मी आज जिवंत झालो,
असण्यात माझ्या मी धन्य झालो.
स्पर्शिता तिने मी मुग्ध झालो,
दिवसापणी चांदण्यात नाहून गेलो. 

Thursday, May 10, 2012

हृदयातील दुख: जास्त दिवस लपून राहत नाही,
डोळ्यातून ते वाहत येत..
तुझ्या माझ्या प्रेमातील नाजूक क्षणांना ते नेहमीच आठवू पाहत.









आठवणीत जगताना मन कधी एकट नसत,
पण एकटपण चार-चौघात नेहमीच असत....    

Wednesday, April 4, 2012

तू असल्यावर दुसर काही आठवत नाही,
रिकाम्या वाटेवरून जातानाही, ती सुनी वाटत नाही.
तुझी आठवण न घेवून येणारा,
दिवस कधी येवूच नाही.
हृदयात तुझ्या मीच आहे, 
आता मला बाहेर कुठे फिरावेसे वाटत नाही.

कधी इतक प्रेम मी केल,
मलाच ठावूक नाही.
भावनांच्या सागराला मी आता,
कुठलेच मी बंध ठेवले नाही.

प्रेम असलं कि काही सुचत नाही,
एकांतात अचानक हसू येई,
रात्र रात्र जागून,
मन उगाचच स्वप्न पाही.


प्रेम म्हणजे तुझा ध्यास,
नसलेल्या तुझ्या सहवासाचा उगाच अट्टहास.
प्रेम म्हणजे माझे स्वप्न, 
तुझ्या आठवणीतले क्षण हृदयात जपण.

Friday, March 2, 2012


Name:  love memories.jpg
Views: 79
Size:  21.8 KBरूजतात श्वास श्वासात,
भाव उमलतात या मनी,
तुझे रूप या लोचनी,
नसे मना आस आता कुठलीच आणि!

श्रावण सर एक अशी भिजवून गेली,
मनात तुझी अजून एक आठवण ठेवून गेली.
समजावतो त्या मनाला मी हि,
नको करू हट्ट तिच्यासाठी, ती आता आपली नाही.

आईक ना जरा हा आवाज स्पंदनांचा,
किती हवा आहे सहवास तुझा त्यांना.
प्रत्येक स्पंदन तुझेच आता नाव घेते,
माझ्या हृदयातून ते तुलाच आवाज देते.

अशांत विचार आणि मन हि तसेच,
नको आता वर्दळ, नको ती गर्दी,
माझ्या मनात तुझ्या आठवणीची भरती.
तुझ्या सोबतीत आज सांज मालवून गेली,
स्वप्न उरी माझ्या ठेवून तू गेली.
अधीर माझ्या स्पंदनांना,
तू अजून अधीर करून गेली.

Monday, January 16, 2012


सांज होताना तो रवी हि हसत जातो,
माझ्या वाट पाहण्याला तो वेडपण म्हणून जातो.
मन माझे सांगते त्याला, हे तुझे वर वरचे हसणे खोटे,
माझ्या वाट पाहण्यात तुझे हि काही क्षण अजून साठे.
तुला हि माहित आहे तो क्षण कसा असतो,
तू हि मावालताना मग का असा शांत शांत असतो.

तुझा माझा एक ध्यास उरी मिलनाची दोघा आस,
नसे नयनात तुझ शिवाय काही,
ओघळणाऱ्या अश्रुतही तुझेच रूप सई....

पहाटेच्या थंडीलाहि सहज मी अंगावर घेतली,
तुझ्या प्रीतीच्या उबेत मला तीही नाही झोंबली.

काही तरी बोलायचं होत शब्दा-शब्दात राहुन गेल,
स्वप्न पूर्ण होत- होता कुणीतरी जाग करून गेल.