Thursday, June 30, 2011


निवांत बसता बसता अचानक तू आठवावी, 
शोधात असतो मी जिच्या ती सहजच सापडावी.
ह्यापर आनंद या जगी दुसरा कुठलच नसे,
मी मागावे तुला अन तू अवचित समोर यावी.



या संजावेलेला तुझी आठवण मला व्हावी,
मी न मागताच माझी मागणी पूर्ण व्हावी.
हळूच सुटता गारवा ह्या देही शहारे यावे,
तुझ्याच हृदयात आता मी विलीन व्हावे.


मी थेंब पावसाचा तू तहानलेली धरती,
प्रीत हि अशी आगळी आपली,
तुला मिळताच मिळते मला हि मुक्ती.

रोझच तुझी वाट मी पाहीन, 
रोज तुझ्या वाटेवर मी एकटाच उभा राहीन.
नाही ऐकणार मी ह्या जगाचे,
त्यांना काय माहित कि तू जरी नाही आलीस तरी तुझी आठवण मला तिथे येते.

आज काल मी माझा राहिलोच नाही,
तुझ्या विचारनाशिवाय मला काही सुचतच नाही.
वाटते तुला हे सांगावे,
माझ्या प्रीतेचे भाव तुझ्या हि मनावर जरा उमटावे.

मी आणि माझे मन


मी दिलासा देतो मज मना, जा विसरून त्या उडून गेल्या पाखरा.  
सोड हा हट्ट तुझा, का मलाही तू देतो आता वेदना.
चूक माझीच झाली, मी मोहात तुला त्या पडले.
न होते जे कधी आपले, त्यास तुज जपाया लावले. 
तू वेडा आणि मी हि वेडा झालो त्या क्षणा,
जेव्हा सूर तिने तुझ्या मनी ते छेडले.
तुलाच मी माझ्या मोहापायी या संकटात टाकले,
आता तू हि माझा सूड घेण्यासाठी, तिच्या आठवणीचे वादळ माझ्या समोर मांडले.
मी हि कासावीस आता तुही नाही त्यातून वेगळा,
तिने आपल्या समोर न ठेवला मार्ग कुठला मोकळा.
मी आवाज देत राहिलो अन तू हि मुसमुसत राहिला,
तिने न मला पलटून पहिले न तुला दिला कुठलाच आसरा.
सोड आता तरी तू तिचा ध्यास, कर मला हि मोकळा,
मला विसरू दे अन तू हि विसर जो कधी नव्हताच आपला.

Monday, June 27, 2011

तुझ विन ....

सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,

ती पायवाट तुझीच आहे जिच्या वरती मी आहे उभा.
अजून हि तो झुला वाट्पाहून तुझी झुलतो एकटा,
त्या पारिजातकाचे फुले सुकून जातील, त्यातील गंध जो तुझ्यासाठी वेडा.
सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,
घनाची बरसात होवूनही मी तुझ्या विना तापलेला.
बघ ह्या श्रावण धारा आणि माझे अश्रू वेगळे का,
तुझ्याच साठी नयनाखाली हा महासागर दाटला.
सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,
साचलेल्या त्या काही ओंजळीतील माझ्या थेम्बाना स्पर्श करून जा.
हा गारवा आज मला मद धुंद करून जाणार आहे,
तुझ्याच प्रीतीत मी आज नाहून जाणार आहे.
सये तुझ विन मी कसा आहे, जरा येवून तू पाहून जा,

Saturday, June 25, 2011

मन तुझ्यासाठीच वेडे

प्रत्येक श्वासागणिक येणारे नाव तुझे,
आठवणीच्या वादळातील एकटेच हे मन माझे.
अश्रुंतील प्रतिबिंब तुझे,
पाणावलेल्या नायानाखाली माझ्या.
हे रात्र दिवस उलटून गेले,
मनीचे भाव मनातच राहून गेले,
न कळली प्रीत तुला माझी,
माझे प्रेम अधुरेच राहून गेले.
तू अशी दूर झाली,
मन मानेनाच आता, तुझ्या आठवणीचा माझ्या हृदयात एक खोपा.
चित्त माझे हरपून गेले,
पाणावलेले नयन अजूनच पाणावून आले,
ओढ तुझी सतत लागे, तूच दूर झाली तरी मन तुझ्यासाठीच वेडे.


रोज संध्याकाळी ढग दाटून येतात, हळूच  वारा  सुटतो  आणि  आपल्या  बरोबर  ढग  घेवून  जातो  पाउस   मात्र  पडत  नाही. तसेच  काहीसे  माझे  आता  झाले  आहे   मी  रोज  तुझी  वाट  पाहतो  आणि  निराश  होतो  मात्र  मन  मानत  नाही.

Friday, June 17, 2011

मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला

मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला,
ती जेव्हा येईल तेव्हा स्पर्श नको चिखलाचा तिच्या पायाला,
ती आणि तिचे ते रूप मला पाहायचे आहे भिजताना,
बघायचे आहे मला तिच्या ओठांवरती ते थेंब थांबताना,
हळुवार तिच्या केसांवरून ते पाणी ओघळताना.
मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला,
ती आल्यवर मात्र तू असा बरस,
कि उशीर होईल तिला हि घरी निघताना,
ती अलगद यावी बाहूत माझ्या सावरताना स्वताला,
छेडून दे तू तर ह्या विजेच्या असंख्य आज,
कि तिने सोडूच नाही माझे बाहू आज.
मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला,
बेधुंद होऊन आज तू बरसत जा ती जवळ माझ्या असताना,
जर तुला थेंब कमी पडले तर घेवून जा आनंद अश्रू माझे जाताना.
तिच्या त्या सहवासासाठी मी माझा प्रत्येक श्वास तुला देईन,
अन त्या बदल्यात फक्त तुझ्या काही श्रावण सरींचीच वाट पाहीन.
मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला

तूच माझ्यात

टिपूस टिपूस नभ बरसत आहे,
निसर्ग आणि मी एकटाच आज नहात आहे.
ओल्याचिंब सरी, अन पाणावलेले डोळे,
त्या पडणाऱ्या थेम्बाबरोबर माझे अश्रू हि ओले.
तुझ्याविना सखे आता,
पडणारा पाऊस जसा निखारा.
प्रत्येक थेंब गणिक मनात आठवणीचा तुफान वारा.
चालताना पाऊले जड होऊन गेली,
भिजलो मी मात्र मन माझे कोरडेच तू ठेवून गेली.
फुललेली वेली आणि आज हि फुले,
सुकलेली मात्र माझी प्रीत कळी.
रस्ते सर्व स्वच्छ मलीन झाल्या पायवाटा,
पाहताना मन उदास नयनाखाली अश्रूच्या लाटा.
सावरलो मी अन सावरले मन,
जाणतो तू नाही आणि तूच माझ्यात पण.

Wednesday, June 15, 2011

माहित असते मला हि तू येणार नाही,
पण  मन मात्र तुझी ओढ सोडत नाही,
मी समजावतो मला,
आणि मग मी हि त्याचे मन मोडत नाही.

काय मागावे मी तुझं कडे,
तूच ते देणारी,
अन तूच ते परत घेणारी,
माझ्याकडे उरलेला आहे फक्त हृदयाचा रिकामा कप्पा.

तारा तुटताना अनेक जन बघतात,
आणि त्याकडे काही न काही मागतात,
दुसर्याच्या तुटण्यात आपल सुख बघतात.

मी दवबिंदू तहानलेला, तू कमळ पाकळी,
स्पर्शितो तुझ मी जेव्हा, खुलते तुझी प्रीत कळी.
आसमंत हा खुलतो, बरसतात ह्या श्रावण सरी,
आपल्या प्रीत नाहून जात आहे आज हि सृष्टी सारी.

आज तर बरसत आहे जलधारा,
तुझ्याच वाटेवरी.
येवून जा एकदा सखे,
मी मदन वेडा तू माझी रती.

Tuesday, June 14, 2011

उपाशी पोटी...

पंख माझे पसरून उडालो होतो मी गगनात,
चुबंया त्या विशाल नभास,
ना पहिले मी कधी वळून मागे,
ना ठेवलं कुठल नात मनात,
ध्यास एकाच होता उडण्याचा,
विसरून मागे आपल्या जगास.
उडता उडता थकून गेलो,
ना राहिला कुठला सहारा.
मागे धावता धावता स्वप्नाच्या,
उरला आहे फक्त आता जवळ पैश्याचा ढिगारा.
नाती तुटलीत, मैत्री सुटली,
एकटाच मी शिखरावर उभा.
झेंडा माझ्या हातात तरी,
न जयकार करणारा कोणी माझा.
सांभाळून ठेवली नाही कधी ती नात्यांची शिदोरी,
म्हणूनच आहे आज उपाशी पोटी मी......
मी आणि माझे शब्द नेहमी तुझेच नाव घेतात,
तू नसतानाही तुझ्याच आठवणी मध्ये रमून जातात.
त्या तुझ्या आठवणीना मी सांभाळून ठेवतो,
तू दिसल्यावर मात्र अश्रू बनवून त्यांना मी मोकळे करतो.

Saturday, June 11, 2011

स्मृतीं...

खरच मला तुला विसरायचे आहे, 
त्या तुझ्या  आठवणीना मनातून पुसायचे आहे.
नको तो ध्यास तुझा, नको ती तळमळ,
नको पुन्हा नयनाखाली अश्रूंचा सागर.
रणरणत्या उन्हातून आता मला सावलीत चालायचं आहे,
तुला दिलेल्या घावांवर्ती जरा मलम मला लावायचं आहे.
वाट पाहण्यात तुझी उभ्या पायांना माझ्या जरा बसवायचं आहे,
वाट पाहून थकलेल्या त्या नयनांना जरास का होईना मिटवायच आहे.
धडधडनार्या स्पन्दनाना हळू जरा करायचं आहे,
त्रासलेल्या हृदयाला आज मला शांत करायचं आहे.
प्रितीतील घाव हे न बुजनारे आहे,
परंतु त्या जख्मानाच आता मला विसरायचे आहे.
जा तू खरच जा दूर माझ्या पासून,
आता मला तुझ्या विना ह्या जगात एकटाच जगायचं आहे.
कारण उरलेल्या त्या काही स्मृतींना तुझ्या मला अजरामर करायचं आहे.









Thursday, June 9, 2011

मी शिंपले आसवांचे सडे तुझ्या पायाशी,
फुले झालीत थेंब माझ्या रक्ताची.
तुला ना कळले कधी भाव माझ्या मनातील,
बाहुल्याच्या खेळ समजून तू खेळत राहिली माझ्या हृदयाशी.

Saturday, June 4, 2011

अशी आहे ती.....

अशी आहे ती.....
एखाद्या रोपट्याने पाण्याच्या एका थेंबासाठी झुरावे अन अचानक मेघांनी बरसात करून त्या रोपाला जीवनदान द्यावे...
अशी आहे ती.....
लाखो शिपले शोधून शोधून थकून जावे अन अचानक हातामध्ये मोती सापडावा....
अशी आहे ती.....
ग्रीश्मामध्ये चालून चालून थकून जावे अन अचानकच घनदाट सावली दिसावी...
अशी आहे ती.....
दरी खोर्यात अवखळ बिनधास्त वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे ...
अशी आहे ती.....
काळोख्या रात्री चांदणे पडावे....
अशी आहे ती.....
तहानलेल्याला जलामृत बनणारी......
अशी आहे ती.....
लाजाळूच्या पानाप्रमाणे हलकेच लाजणारी.....
अशी आहे ती.....
आपण स्पर्श करावा आणि ती मलीन व्हावी इतकी नाजूक....
अशी आहे ती.....
अशांत माझ्या मनाला शांत करताना हसणारी..
अशी आहे ती.....

Thursday, June 2, 2011

अस नाही कि, मी एकटा असल्यावर तुझी आठवण येते.
तुझी आठवण आल्यावर मात्र खरच मी एकटा होतो.
तुझ्या समवेत चे काही क्षण पुन्हा आठवतो,
कोरड्या माझ्या नयना मी उगचः पानावतो.
तुझ्यासाठी माझे मी हृदय सतत जाळतो,
तू वर्ष ऋतू होवून बरसशील म्हणून तुझ्या वाटेवर नयन लावतो.




Wednesday, June 1, 2011

त्या एका नजरेनेच, तू माझ्या हृदयात बसलीस.
आठवण तुझी आता माझ्या प्रत्येक श्वासात बसली.

मर्म दिसले नजरेत तुझ्या, थोडासा दर्द (वेदना)  हृदयात माझ्या.
गेलीस बघून एकदा फक्त,
रोझच मारणाऱ्या हृदयाला माझ्या.

तुझ्या नयनातील तृश्नेला आज हि मी जाणतो.
पाणावून नयन माझे, तुझीच मी तहान भागवतो. 

चालताना वाटेवर सर्वत्र धुके होते,
ह्या धुक्यात हि नयन माझे तुलाच शिधात होते.

पडणाऱ्या त्या पावसाच्या थेम्बाना देवा आता तरी म्हण थांब,
तीच नाही आली तर पावूस पडूनही सुकेल माझ्या प्रीतीचे रान.

तू बांधलेला झुला, आज हि तुझी वाट पाहतो आहे.
तू आता येत नाही म्हणून तो एकटाच झुलत आहे.

अबोलीच्या फुलाप्रमाणे तू अबोलच राहिली,
प्रीत समजून हि माझी, तू प्रीती पासून दूर राहिली.

मनातील भावनांना तुझ्या मी अनेकदा स्पर्श केला.
त्या स्पर्शाची हि तुला आता कुठलीच ओढ राहिली.
तोडलेस बंद सारे तू आता तू नाही राहिली.




lovers - Bologna, Bolognaतुझ्या सारखे दिसणारे मला खूप दिसतील,
परंतु तुझ्या आठवणी मनातून माझ्या कश्या निघतील.

सांग न तू तुला विसरू कसा,
आसवांच्या बांधला आडवू कसा.

तुला पाहताना डोळ्याची पापणी जरा हि लावली नाही,
तुझे हास्य असेच राहू दे,
कारण माझ्या मनातील व्याकुळता अजून शमली नाही.

फुलांच्या गंधात गंध  तुझाच येतो,
 तुझ्या स्थित प्रीतीला माझ्या बहार येतो.

शपत घेवून सांगतो आठवण तुझी खूप येते.
तू परत भेटणार नाही या वेदनेने, मन माझे आणखी व्याकुळ होते.

वाळलेली पर्णे आज सरकन उडून जात आहे,
दूर झाल्यावर तू, आठवण तुझी खूपच येत आहे.

घेताना श्वास फक्त एकदा मला आठव,
त्या श्वासाबरोबर मी तुझ्या हृदयात जाईल.
सोडताना श्वास मात्र मला विसर,
तरच मला सदैव तुझ्या हृदयात राहता येईल.
छंद नाही मला तुला पाहण्याचा,
पण ह्या नायांना कस समजावू.
नाही आठवणार तुला असे म्हणतो,
पण मन मात्र मानत नाही.

एका ढगाने दुसर्या ढगाला हळूच काहीतरी सांगितले,
प्रिये तू येणार आहे म्हणून आह ते हे मस्त होऊन बरसले.

सृष्टीने आज पर्नाचे हिरवे लेणे नेसले,
तुझ्यासवे सखे आज अनंत श्रावण बरसले.

खूप दिवसांनी तू आज मला वाटेत भेटली,
मिलनात आपल्या आज वरून राजाने हि हजेरी लावली.

गंध फुलांचा हळूच यावा, तुझ संगे प्रेमाला माझ्या मोहर यावा.

का कुणाच ठावूक हे शब्द प्रेम गीताच लिहितात,
तुझी ओढ माझ्या मनाला अलगद लावून जातात.

सांग न खरच तुला माझी आठवण येत नाही का?
माझ्या हृद्याच दुख: तुला कळत नाही का?

तुझा चेहरा आज खूपच आठवतो,
तुला पाहण्यासाठी आता मी नयनांना मिटवतो.

तू तुझ्या जगात नक्कीच सुखी असशील,
परंतु मनात तुझ्या हि काही माझ्या आठवणी असतील.



शब्दांचे मोल.......

सहज सुचत म्हणून मी कधी लिहित नाही,
खर सांगायचं तर तुझ्या शिवाय मला काही सुचतच नाही.
मनातील विचार शब्दाचे कधी रूप घेतात कळतच नाही,
अन मी शब्दांना रूप दिल्यावर तुझीच आठवण अधिक मला येई.
मग माझे शब्द कधी रुसतात आणि कधी ते रडतात,
तुझ्या अन माझ्यातील दुराव्यावर ते मग अधिकच चिडतात.
तुला खर सांगू मला हि ते पाहवत नाही,
पण तुला सांगून हि तुला ते खर वाटत नाही.
मी आणि माझे मन स्वतालाच समजावतो,
तू आणि तुझ्या आठवणीना मग आम्ही पुन्हा आठवतो.
लिहिण्यासाठी घेतो मी हातात काही,
प्रिये तुझ्या विचारशिवाय दुसरे मला काही सुचतच नाही.
मी प्रयास करत नाही असे हि नाही,
पण तू लावलेली सवय माझ्या शब्दांना आता सुटत नाही.
तुझ्या साठी किती लिहू आणि किती नको असे होऊन जाते,
पण माझ्या शब्दांचे मोल मात्र तुझ्या हृदयात होत नाही.