Wednesday, August 29, 2012

श्रावणातील इंद्रधनू कधी, 
कधी सुगंध फुलांचा झाली,
दरवळत सर्वत्र तू ,
हृदयात माझ्या गंध सोडून गेली.

एकटे असताना मी,
ढग दाटते आठवणीचे,
पाणावतात नयन,
अन ओघळत्या थेंबात रूप तुझे.

Monday, August 27, 2012

जाईल मी सर्व सोडून तेव्हा तू हि रडशील,
ओघळणार्या नयनातील आश्रुना किती सावरशील.
प्रत्येक अश्रू माझी आठवण मागे ठेवून जाईल,
न आठवता हि तू,  तुला एक नवी आठवण देवून जाईल.

लिहीण्यासारख खूप काही होते,
पण मी तुझ्यासाठीच लिहिले,
शब्दांना मांडताना तुलाच,
मी मूर्त रूप मानल.

Wednesday, August 15, 2012

मन सावरून तूला बर जगता आल,
समजून भावनांना माझ्या,
तुला, पाणावलेल्या डोळ्यांना बघून माझ्या बर हसू आल.

मी जरी तिला विसरतो,
का हे मना तू तिचा ध्यास करतो.
झाले अनोळखी सर्व काही,
तरी आत कुठेतरी तीच वास करते.

शोध सुरु आहे अजूनहि तुझा माझ्या अंतरंगात,
तू मात्र मंत्रमुग्ध ह्या भर पावसात.
प्रत्येक थेंब तुझाच स्पर्श देतो आहे,
साठवलेल्या आठवांना नयनातून वाट करून देत आहे.

सरगम थेंबांची जरा ऐकून जा,
उतावीळ मनाला शांत करून जा.

मी माझ अस्तित्व हरवून बसलो आहे,
तुझ्या साठीच मी अजून झुरलो आहे.
नसतेस तू जेव्हा,
मी एकटाच या पावसात भिजलो आहे.

माझ्या उदास पनातही तू साथ देत होतास,
माझ्या आनंदातही तूच होतास,
मग असे आज काय झाले तू दाटून तर आलास,
मात्र अश्रूनि माझे नयन बरसून गेले.

मी जे गातो ते गीत आहे तू,
स्पंदनातून निघणारे संगीत आहे तू.
तहानते मन माझे जेव्हा,
बरसणाऱ्या पावसाचे थेंब बनते तू.

तुझ्यासाठीच मी तुला विसरणार आहे,
मन नाही मानत पण मी मानणार आहे.
सांडताना मोती नयनातून मी,
तुझ्या हास्यासाठी मी हसणार आहे,