Wednesday, September 21, 2011

त्याला मी सतत शोधत राहतो....

टप टपताना थेंब पावसाचे मी दुरूनच पाहतो,
तो मात्र थेबांमध्ये चिंब भिजून जातो.
पडता थेंब चिखलाचे अंगावर मी त्रासून जातो,
तो मात्र त्या पाण्यात उड्या मारत जातो.
मी भिजू नये म्हणून छत्रीचा सहारा घेतो,
तो मात्र सर्व झुगारून मनसोक्त भिजत राहतो.
मी एकटाच सर्वाना दुरून पाहतो,
तो सर्वांच्या गप्पांमध्ये मिसळून जातो.
मी सर्व समस्यांचा विचार करतो,
तो हसतो आणि सारे काही विसरून जातो.
मी आठवतो कुणा तरी,
तो मात्र त्याच्या आठवणीत राहतो.
नसते कुणी जेव्हा मी उदास होऊन जातो,
तो शिळ घालत मित्रांबरोबर चालत जातो.
मी अन तो वेगळा नाही, पण तो अन मी वेगळा होतो,
माझ्यातीलच त्याला मी सतत शोधत राहतो.

आज भेट नाही न झाली काल,
गेले दिवस जसे मी नाही या जगात.
कुणी तरी येत दिलासा देवून जात, 
त्यांना काय माहित शरीराला नको कुठलाच आधार.
आता नीर डोळ्यातील सुकून जातील,
पण उमटलेल्या रेखा गालावरील तश्याच राहतील.

जगतो मी आता आठवणीच्या सहारयावर,
रोज तुझी मनाला ह्या नवी ओढ.
सावरतो जेव्हा मी ढासळते मन,
मन सावरताना ढळतो आसवांचा बांध.

जरा तू दूर जरा मी दूर,
आहेत तरी बंध आपले प्रीतीचे अतूट,
नाही वेगळी तू माझ्या हृदयातून,
तरी का ते तुझ्यासाठीच आतुर.

Friday, September 16, 2011

सावलीत चालताना सावली दिसत नाही,
पावसात कधी हे अश्रू कुणालाच दिसत नाही.
तू जवळ असताना तुझी उणीव कधीच भासत नाही.
तू नसताना मन तुझ्यासाठी हट्ट करते, मग मी त्याचे मन मोडत नाही.



मला फुलपाखरू आवडते म्हणून मी त्याला माझ्या मुठीत बंद करून ठेवत नाही,
मला चंद्र आवडतो पण मी त्याचा हट्ट करत नाही.
तशीच तू हि मला आवडते, म्हणून तू माझ्या जवळ असावे अस नाही.
कारण तू कुठे असो तू मला आवडतेस आणि आवडतच राहणार.

Wednesday, September 14, 2011

तुला विसरण्याची किंमत खूप मोठी होती,
मनात तुझी प्रत्येक आठवण रडत होती.
सावरता सावरता नयन सांडवत होते मोती,
सांडतानाही त्यांना तुझी आठवण होत होती.







कस सरता सरेना धुक तुझ्या प्रितीच,
दाटतच चालत जितक मी दूर सारल.
नवते इतके कधी टिपूस ह्या डोळ्यान गाळल,
ओघळणाऱ्या थेंबाच हातावर तळ साचल.





तुझ्या माझ्या मधील दिस कधी जातील उडून,
राहील मागे फक्त तुझ्या आठवणीच ऊन.
शोधाया तुझ फिरतील डोळे उगाच,
नसशील तू जेव्हा कसा येईल श्रावण.

Monday, September 12, 2011

तुझे न माझे नाते थेंब पावसाचे,
साचवावे परी न साचे जसे उरी भाव तुझे.
स्पर्श गार होता शहारते अंग सारे,
प्रेम तुझेच आता देते ऊब येथे.

Rainbow Over A Hillरीत हि कळली उशिरा का मला,
झाले जेव्हा सर्व तुकडे तुझे मना.
सावरता सावरता अश्रूही दाटून आले,
किती रंग होते हृदयी, सर्व बेरंग झाले.

सुटत चालले मागे तुझे गाव,
न मला न मनाला होती कुठली ठाव.
आज नयनही आश्चर्य करत होते,
कुठून हे अश्रुंचे पाट वाहत होते.

Friday, September 9, 2011

समजावतो पाऊस वेडा बरसून सारी रात,
उद्या ती येणार नाही का पाहशी तू वाट.
साचले पाणी अंगणात आणि थोडे या नयनात,
ती नाही तुझसाठी मग का तू असा अधीर मिलनास.

मी बसलो जेव्हा जेव्हा वाट पाहत तुझी,
नाही येणे जमले तुला तू अशी कशी?
मन उदास होऊन गेले सदा सांजवेळी,
मावला तो रवी पण न  मावळली वेडी आशा माझी.

तुझ्या आठवणीचा हा झरा वाहतच राहतो,
भिजण्यासाठी मी हि मग आतुर होऊन जातो.
विचारांचे वारे मनाला स्पर्श करून जातात,
तुझ्या स्मृतीचा गंध मागे ठेवून जातात.

मला आवडत तुझ्या विचारात रात्र रात्र जागायला,
तुझ्या सोबतच्या त्या क्षणांना हृदयात जपायला.
आज तुझ्यासाठी लिहीहायला शब्द कमी पडतात,
तुझ्यासाठीच ते आता माझ्या कडे हट्ट करतात.

Monday, September 5, 2011

अशीच अवचित आली समोर आज तू पुन्हा,
सोडून तुझा विचार मी जगत होतो जेव्हा.
वाटले मनाला बोलावे तुजपाशी काही,
पण तो धीर आता माझ्या मनालाही होत नाही.

तुला नसेल येत आठवण पण मला रोज येते,
तू नाही म्हणून तुला शोधण्यातच सर्व वेळ जाते.
तू अशीच आता झाली, 
रंग हाताच्या बोटावर ठेवून फुल पाखरागत उडून गेली.

मी लिहिलेल्या ओळींना आता माझाच आक्षेप असतो,
विचार वेगळे अन मी प्रत्येक्षात मात्र वेगळेच लिहितो.
शब्द अचानक मला दगा देवून जातात,
तुझा विचार नसतानाही तुलाच स्मरून जातात.
तिच्या नजरेतील प्रत्येक भाव हा घाव देत होता,
मला वाटयाचे मी एकटाच त्या नजरेचा जख्मी.
पण तिचे घायाळ तर अनेक जण होते,
फक्त त्या मध्ये माझा पहिला नंबर होता.. 

एकदा एका भवर्याला सफेद गुलाबवर प्रेम झाले, त्याने त्याला प्रपोस केले. त्यावर गुलाब बोलला ज्या दिवशी मी लाल होईल तेव्हाच मी तुला होकार देईल आणि त्या भवरयाने लगेच जवळ असलेल्या गुलाब काट्यावर आपले शरीर टोचून घेतले त्याचे ते रक्त त्या गुलाब पुष्पावर पडले. पाहता पाहता सर्व गुलाब लाल झाला. परंतु त्याचा होकार ऐकण्यासाठी तो भवरा जिवंत नव्हता. प्रेम आणि बलिदान हि एकाच नाण्याची बाजू आहेत मग आपणच ठरवायचं कि प्रेम द्यायचं कि बलिदान घ्यायचं.