Tuesday, October 18, 2011

आळ्वाचा थेंब ...

तिने पहिले कधी स्वप्न माझ्या डोळ्यातील,
मग तिला हि कळेल, ती किती सुंदर आहे.
समजली अर्थ कधी माझ्या शब्दांचा,
तर कळला असता तिला मर्म त्यातला.
जर पहिले कधी तिने थेंब डोळ्यातला,
कळले असते तिला दर्द त्या मागचा.
थांबली कधी असती ती वाट पाहण्यास,
कळला असता तो क्षण यातनांचा.
भिजली असती ती चिंब पावसात,
कळली असती उब ह्या बहुतील तिला.
प्रीत कधी केली तिने न केले ते प्रेम,
माझ्या प्रेमाला दिले रूप जसे आळ्वावरचे थेंब.

Monday, October 17, 2011

सखे पाउस आणि तू संगेच येत जा

सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
म्हणजे त्या क्षणांना वेगळाच अर्थ येईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
म्हणजे त्या इंद्र धनुला हि नवीन रंग प्राप्त होईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
मग ती सृष्टी हि स्वतःच त्या जलधारात न्हात राहील.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
मग मी हि चिंब होईल, 
तुझ्या गालावरून ओघाणाऱ्या त्या थेम्बाना माझ्या ओठावर घेईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
मग माझ्या या असण्याला जिवंतपण येईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
सगळी कडे पाणी आणि माझ्या आनंद अश्रूंची हि बरसात होईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा,
म्हणजे मी हि जरा वेळ तुझ्या सोबत राहील,
अन सर्व काही विसरून तुझाच मी होईल.
सखे पाउस आणि तू संगेच येत जा.....

Friday, October 14, 2011

जा जरा पावसात तू हि भिजून ये, 
दोन थेंब माझ्या वाट्याचे त्याकडे मागून ये.
नसेल मला घेता येत आनंद त्याचा,
तू मात्र मनसोक्त भिजून ये.
तुझ्या भिजलेल्या केसांतील थेम्बाना मात्र हलकेच माझ्या हातावर दे.
ते ओघळून टप टपनारे थेंब मी माझ्या हृदयात साठवून ठेवीन,
तुझ्या सोबतच्या क्षणांना मी सदैव ह्या हृदयात ठेवीन.
नसेल माझ्या जवळ जेव्हा तू किवां हा ऋतू, 
तेव्हां ह्याच काही सुंदर आठवणींवर मी जगेन.

Tuesday, October 11, 2011

नाजूक त्या पावलांच्या खुणा तश्याच आहे,
ती दूर मात्र आठवणी जवळच आहे.
मन वेड तिच्याचसाठी, ओली कड नयनांची,
सदैव ध्यास तिचा का न तिला कल्पना याची?




हृदयातील धड धड अचानक का वाढावी,
नको नको म्हणता का ती आठवावी.
मृगजळ म्हणतात ते हेच असते का?
ती समोर असूनहि माझी नि तिची प्रीत अधुरीच राहावी.










तुझ्या माझ्यातील हे क्षण जातील सरून,
उरेल मागे फक्त आठवणीचे उन्ह.
नसेल कुठेच मग गार सावलीचा कोना,
तुला हि चालावे लागेल मग माझ्या विना.

Friday, October 7, 2011

प्रीतीची ही आग

कसे सरले दिस तुझ्या संगतीत, 
उरले ते आता आठवणीचे क्षण,
तुटला आसवांचा बांध,
सोडताना तुझा हाथ.
थांब सये नको जाऊ अशी तू दूर,
सांगायची आहे मला माझ्या मनातील हुरहूर.
कशीतरी जाते ती रात काही ती पहाट,
दिवसा मात्र तुझ्याचसाठी तुझ्या वाटेवर.
सरता सरत नाही हा दिस माझा वैरी,
तुला भेटण्याची आता आगळीच धुंदी.
कसे समजावू, तुला कसे हे कळेना,
विझता विझेना तू लावलेली प्रीतीची ही आग.
तुला माहितच आहे मी कसा तुझ्यासाठी झुरतो,
तुझ्या एका नझरेसाठी मी अजून जगतो.

Tuesday, October 4, 2011

म्हणतात जर ती तुमच्या जवळून जाताना माघारी वळून बघत असेल तर ती तुमच्या वर प्रेम करते, ती तर रोझच मागे वळून बघायची पण तिचे माझ्यावर प्रेम नाही...बहुतेक तिला डोळ्यांचा आजार असावा.

खर तर आज मला खूप काही सुंदर लिहीयायाच होत कारण पहाटेच ती माझ्या स्वप्नात येवून गेली होती आणि अजूनही तिच्या त्या सुंदर सहवासातून मी पूर्ण बाहेर आलो नव्हतो. पण का कुणाच ठावूक मी माझ्या शब्दांवरचे आज प्रभुत्व हरवून बसलो आहे, तिच्या साठी लिहावे म्हणतो पण शब्दच सुचत नाही आहे. असे मला होते कधी कधी तिच्या आठवणी आणि ती दोन्ही माझ्या जवळ असल्यावर.

सगळ्यात अवघड क्षण आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून हि न भेटता येण किवा न बोलता येण. जेव्हा त्यानेच आपल्याला तशी शपत घातलेली असते.