Tuesday, August 2, 2011

मी अन तो

कधी कधी मी वेगळा होऊन जातो,
मी माझ्यावरतीच शंका घेत राहतो.
स्वस्त बसता याची जाणीव होते,
कि मी माझ्यातच आता दोघे पाहतो.
मी प्रत्येकावर शंका घेतो,
तो प्रत्येकात प्रेम पाहतो.
मी उगाच घरातूनच पावूस पाहत राहतो,
तो मस्त कधी पावसात फिरून  येतो.
मी त्याला वेडे म्हणतो,
अन तो माझ्यावर स्मित करून पुढे निघून जातो.
मी उगाच चिडचिड करतो,
अन तो मलाच समजावत बसतो.
मी जीवनाला वैतागून जातो,
तो मात्र जीवनातील सर्व रंग उधळीत राहतो.
जे कधी कधी मला जमत नाही,
तो एका क्षणात तडीला नेतो.
तो असाच राहावा म्हणून मी प्रयत्न करत राहतो,
मात्र ह्या सर्व व्यापात मी त्याला हरवून बसतो...