Friday, December 13, 2013


उडेल धुंद होऊन पाखरू मनाचे,
असेल तू जवळ जेव्हां बनून पंख माझे. 


कुणीतरी हसावे,
कुणीतरी पहावे. 
शांत  मनाच्या तारांना,
अलगद छेडून जावे.  




एकांतात असशील जेव्हां,
हवा बनून स्पर्श करून जाईल. 
एकदा फक्त आठवून बघ,
तुझ्या मुखावर सदैव हास्य बनून राहील. 
 
रिकामेच येवून,
Kisi seep ke aghosh mein moti ho jaiseगेले रिकामेच पुन्हा. 
आठवांचे ओझे साचले,
भग्न  मनावरती पुन्हा. 

रोज रोज तूच,
रोज रोज तुझीच आठवण. 
व्याकुळ मन तुझसाठी,
अन, डोळ्यात  सागराची साठवण. 

मोत्याच्या रूपासाठी,
शिंपल आयुष्यभर राबलय,
सुंदर दिसावे त्याने,
यासाठी आयुष्य वेचलय. 





स्वप्नांना आकार देता देता,
बाहू थकून जातात.
वेळ मात्र निघून जाते,
स्वप्न तशीच राहतात.

प्रश्न जरी सुटले येथे खोटे बोलून,
मनातील सत्याचा मात्र गुंता होतो.
मुसमुसते मन,
चेहरा हसत राहतो.

रोजचीच आरती मंदिरात,
तरीही शांतता नाही मना.
कशाला हाथ जोडू,
जर अपेक्षा प्राण सोडतात पुन्ह: पुन्ह:


Saturday, April 6, 2013

भाव मनीचा न कळला तुला कधी,
समजून सारे तू अलिप्त कशी,
सांगतात नयन तुझेही,
कि तुलाही आहे प्रीत माझी.

विसरून जगाला मी तुझाच झालो,
आठ्वाच्या सागरात मी न्हावून आलो.



तुझ्यासाठी  मी काहीही असेन, पण माझ्यासाठी  तू ती आहेस,
जिच्या असण्याने माझे हृद्य धडधडते.








कुणासाठी काहीतरी करताना,  मी काहीतरी हरवलं.
आपल्याच हृदयातील भावनांना मी  पुन्हा एकदा रडवलं.







अस म्हणतात कि कुणी आठवण काढत असेल तर तर उचकी लागते,
हे जर खरच सत्य असेल तर मला माफ कर,
 माझ्या मुळे तुला खूपच त्रास होत असणार,
कारण माझा प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीतच जातो. 

Friday, February 8, 2013

मी पहिले  स्वप्नांना जवळून जाताना,
माझ्याच  भावनांना हृदयात रडताना.
उरले जे क्षण माझ्यापाशी,
त्यांनाहि हळू हळू श्वास सोडताना.


मी पाहतो जेव्हा त्या फुलांना,
रूप तुझे त्या अंतरी.
भास नवे माझा,
ते हि तुझ्याचवरती प्रेम करी.