Monday, May 30, 2011

मुक्तमनाने श्रावणसरी,
अंगावरती घेवू,
दे हातात हाथ माझ्या ,
चाल स्वप्न वाटावे अश्या नगरीत जावू.

भेटण्यास तुला मन,
ओसंडून वाहिले,
आज एका झर्याचे मिलन नदीस जाहले.

अदलाबदली हृदयांची आज आपण करू,
माझ्या प्रेमाची तळमळ, देव करो तुला हि कळू.

आज अचानक सखे तू का रुसली,
श्रावण धारांमध्ये तू का नाही माझ्या सोबत भिजली?

ओठांवरती तुझ्या,
प्रेम गीत माझे येवू दे.
ओलेचिंब रूप तुझे या माझ नयनांना पाहू दे.

एकटीच का ग तू आज अशी उभी,
बघ जवळ घेवून मला क्षणभर,
होईल प्रीत स्पर्श तुझ्या हि उरी.

ग्रीष्मात गुलमोहराच्या फुलांनी आज हिरवी पालवी लपली,
सहवासात तुझ्या प्रिये प्रीत माझी फुलली.

हृदयात माझ्या आज पावूस बरसला,
मन मोराने सप्तरंगी पिसारा फुलवला.

सांजवेळी मावळतो आहे तो रवी,
प्रीत तुझी सखे मला रोच त्याच्या जागी सायंकाळी जाली.

तू परत भेटणार नाही,
हे मला माहित आहे.
तुझ्या त्या हास्याची उमटलेली छाप,
आता फक्त माझ्या हृदयावर आहे.