Friday, May 20, 2011

मनातील वादळ...

माझ्या लिहिलेल्या शब्दांना आता कुठलाच अर्थ उरला नाही,
तू नाही जवळ म्हणून आता कुठल्याच फुलांचा मला सुगंध येत नाही.
आकाशातील इंद्रधनू हि आता बेरंग झाला आहे,
अन बरसणाऱ्या मेघांबरोबर माझे हृदय क्षणोक्षण जळत आहे.
वास्तविकता मला कळत नाही असे नाही,
पण तू मला विसरली हे पटत नाही.
रोझच तुला आठवतो,दुसरे आता काही काम नाही.
तुला न आठवता माझ्या हृदयाचे एक हि स्पंदन होत नाही.
स्वप्नानाही आता माझ्या तुझी ओढ असते,
मला झोप येत नाही म्हणून स्वप्न हि माझ्या वर रुसते.
विचारांचे थैमान डोके हलवून जाते,
तुझ्याच ध्यासाने मन अगदी व्याकुळ होते.
सांग तूच आता कसा तुज विन जगू,
ह्या उठलेल्या मनातील वादळांना मी कसे शांत करू.