Tuesday, May 3, 2011

मर्म

शब्दातील मर्म शोधताना,
हजारो शब्द मी वाचले,
कधी ते व्यर्थ,
तर कधी ते अनमोल भासले.
शोधताना मर्म नयनातील,
कित्येक नयन मी पहिले,
कधी ते व्याकुळ,
तर कधी उल्हासित मज दिसले.
शोधताना मर्म जीवनातील,
मी अंतरंगात डोकावून पहिले,
कधी ते उजाड वालवांटासारखे  ,
तर कधी फुललेल्या वसंतासारखे भासले.
शोधताना मर्म मैत्रीतील,
कितेक मित्र मी जोडले,
कधी ते जवळ तर कधी दूर दिसले.
शोधताना मर्म प्रेमातील,
सर्वांवर प्रेम मी करून पहिले,
कधी ते हसणाऱ्या ओठान्सारखे,
तर कधी ते लाजेने खाली जाणारया पापाण्यासारखे भासले.