Saturday, May 7, 2011

मेघ आणि तू

Lev Tsimring: Hope
Add caption
कुठून आले हे मेघ आणि किती आज हे सरसावले,
तू येणार म्हणून कि काय आज ते बेभान होऊन बरसले.
तुझ्या येण्याच्या आनंदात मी हि नाहून गेलो ,
छत्री सोडून मी आज नकळतच पावसाच्या थेबांशी लढत गेलो.
प्रत्येक थेंबाचा स्पर्श जणू तुझाच स्पर्श वाटत होता,
अन अंगावर माझ्या प्रत्येक थेंबा गणिक मोहर येत होता.
त्या वातावरणामध्ये तू आणि तुझीच आठवण,
मनावरती हजार वादळांचे आक्रमण.
मातीचा तो गंध मला धुंध करून जात होता,
तुझ्याच एक भेटीसाठी माझा जीव वेडा-पिसा होता.
रस्त्यावर साचलेले होते मेघांचे जल,
अन माझ्या हृदयात तुझ्या विचाराची हलचल.
मेघ हि आता बरसून बरसून दमून गेले,
तू येत नाही म्हटल्यावर ते माझ्या वरती जसे रुसून गेले.
सगळीकडे आता शांतता पसरली होती,
तुझ्या आठवणीत हृदय आणि भरलेले नयन मात्र रात्र भर बरसत होते.