Monday, May 30, 2011

थेंबा थेंबा ने बनतात मेघ सरी,
तुझी आठवण प्रिये, फुलवी श्रावण कळी.

पावसाचा थेंब बनून, 
तुझा स्पर्श सखे करू दे.
ओले चिंब हृदय तुझे,
माझ्या प्रीतीने भरू दे.

समजून घे प्रीत माझी,
नाहीतर थांबेल श्वास माझा.
आठव तुज मनाला,
भिजलो होतो आपण मागील श्रावणाला.

निळे सावळे नभ हे,
आज बरसणार आहे.
हाती हाथ घेवून तुझा
प्रिये आज मी जगणार आहे.

माळरानावरील फुले,
तू नसताना नाव तुझेच घेतात,
तुझ्या आठवणीत ते,
तुझाच सुगंध देतात.