Wednesday, May 11, 2011

असेच दूर वर चालत जाताना हिरव्यागार गवतात एक शुभ्र कळी दिसली,
अलगद स्पर्श करताच ती गळून पडली.
खूप दुख: झाले का मी स्पर्श केला?
ती सुखी होती तिच्या जगात का मीच तिचा नाश केला?
तिचे जगणे मी का व्यर्थ केले, कि तिला आज मी त्या एकांतातून मुक्त केले.
खूपच वाईट वाटले अन जरा पुढे होताच एक काटेरी झुडूप दिसले.
त्यावरील काटे पाहून मन शहारून गेले,
स्पर्श तर दूरच पण पाहणे हि आता वेदनादायक झाले.
मनात विचार आला कि ती अशी सोडून गेली,
अन जे काही उरले आहे तेही किती रुक्ष आहे.