Friday, March 4, 2011

हरवलेल्या त्या काही....

जगातील प्रत्येक शब्द हा कोणी न कोणी कुठे न  कुठे वापरलेला असतो म्हून काय त्या शब्दाचे मोल कमी होत नाही. तसाच माणसाचे आहे, मानव जात (म्हणूयात आपण ) नेहमी नव नवीन नाते जोडत जातात पण म्हणून काय मग त्या जुन्या नात्यांचे महत्व कमी होते का? नाही ना. मित्रांनो सदैव आपण नवीन मित्र, नवीन नाते जोडण्याचा प्रयातानात असतो पण का मग जुन्या त्या इतक्या मेहनतीने बनवलेल्या( जोडलेल्या ) नात्यांना आपण इतके सहज विसरून जातो.
किती अथक प्रयत्न, मेहनत, प्रेम, आपुलकी इत्यादी. आपण पणाला लावून जे काहि मिळवतो ते किती सहज आपण काळाच्या ओघात सहज मागे टाकून जातो नाही का? असच बघा ना लहानपणी आई बाबा कडून हट्टाने घेतलेली ती खेळणी असू द्या कि मग छोटीशी पेन्सील असू देत घेताना व घेतल्या वरचा आनंद कधी विसरता न येणारा असतो पण आपण सहज तो विसरून जातो. मी म्हणत नाही कि हे सर्व आपण जाणून बुजून करतो पण हीच तर आपली मानवी सवय झाली आहे. त्या आठवणी आपणाकडून कशा सहज हरवल्या जातात ना?
इतक दूरच कशाला आपण आज काल इतके एकरूपी झालो कि आजू बाजूला काय चालू आहे ते पण बघत नाही, का तर कशाला उगाच दुसर्याच्या गोष्टीत लक्ष द्यायचे नाही तर उगाच आपल्या अंगलट यायचे. इतके का आपण एकरूपी ( कि भित्रे) झालो.
किती जणांना आपले सर्व जुने मित्र आणि मैत्रिणी आठवत असतील? आणि जरी माहित (आठवणीत ) असले तरी किती जन त्यांच्या संपर्कात असतील. का तरम्हणे तो खूप दूर राहतो, नाही ती तर मला फोने पण नाही करत, तो बघून ना बघितल्या सारखे करतो, अरे मी ऑनलाइन असलो तरी तो रेप्लाय देत नाही, अरे खूप दिवस झाले आता  तो मला ओळखत हि नसेल आणि अशीच किती तरी करणे पुढे करून आपण पळवाटा शोधात असतो आपल्या प्रेमाच्या मान्सानापासून दूर जाण्यासाठी आणि त्याच वेळेस नवीन मित्र बनवण्यासाठी खूप वेळ काढून, तास न तास त्या बरोबर गफ्फा मारून वेळ घालवतो (हसू येते मला, कारण मी पण हेच केले आहे काही प्रमाणात).
खूप काही असत आपल्याकडे सांभाळण्या सारख पण आपण नेमक तेच हरवून नवीन काही सापडत असतो.
बघू आता किती आपण जुन्या (हरवलेल्या ) गोष्टीना जपून ठेवू.............