Wednesday, March 30, 2011

ती अशी निघून गेली,
बघून माझ्या कडे एकदा.
वाटले मनाला,
फुलेले वसंत ह्या वाळवंटात आता.

कोकिळेच्या प्रत्येक स्वरात,
स्वर तुझाच ऐकू येतो.
प्रत्येक उमलणार्या कळीत,
चेहरा तुझाच मी पाहतो.

नझरेला नझर देताना,
तिची पापणीही नाही झुकली.
मनाने मज सांगितले,
हीच आहे प्रीत आपली.

समजून हि तुज,
मी नाही आजवर समजलो.
त्या तुझ्या झुकणाऱ्या पापण्यांचे,
रहस्य आजवर नाही उमगलो.


बघणारी ती तुझी चोरून नजर,
घायाळ माझ हृदय करून गेली.
स्मित हास्याने तुझ्या,
प्रीत वेल माझी बहरून आली.