Friday, June 17, 2011

मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला

मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला,
ती जेव्हा येईल तेव्हा स्पर्श नको चिखलाचा तिच्या पायाला,
ती आणि तिचे ते रूप मला पाहायचे आहे भिजताना,
बघायचे आहे मला तिच्या ओठांवरती ते थेंब थांबताना,
हळुवार तिच्या केसांवरून ते पाणी ओघळताना.
मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला,
ती आल्यवर मात्र तू असा बरस,
कि उशीर होईल तिला हि घरी निघताना,
ती अलगद यावी बाहूत माझ्या सावरताना स्वताला,
छेडून दे तू तर ह्या विजेच्या असंख्य आज,
कि तिने सोडूच नाही माझे बाहू आज.
मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला,
बेधुंद होऊन आज तू बरसत जा ती जवळ माझ्या असताना,
जर तुला थेंब कमी पडले तर घेवून जा आनंद अश्रू माझे जाताना.
तिच्या त्या सहवासासाठी मी माझा प्रत्येक श्वास तुला देईन,
अन त्या बदल्यात फक्त तुझ्या काही श्रावण सरींचीच वाट पाहीन.
मी सांगितले आहे आज, नको आताच येवू पावसाला