Tuesday, June 14, 2011

उपाशी पोटी...

पंख माझे पसरून उडालो होतो मी गगनात,
चुबंया त्या विशाल नभास,
ना पहिले मी कधी वळून मागे,
ना ठेवलं कुठल नात मनात,
ध्यास एकाच होता उडण्याचा,
विसरून मागे आपल्या जगास.
उडता उडता थकून गेलो,
ना राहिला कुठला सहारा.
मागे धावता धावता स्वप्नाच्या,
उरला आहे फक्त आता जवळ पैश्याचा ढिगारा.
नाती तुटलीत, मैत्री सुटली,
एकटाच मी शिखरावर उभा.
झेंडा माझ्या हातात तरी,
न जयकार करणारा कोणी माझा.
सांभाळून ठेवली नाही कधी ती नात्यांची शिदोरी,
म्हणूनच आहे आज उपाशी पोटी मी......