Friday, June 17, 2011

तूच माझ्यात

टिपूस टिपूस नभ बरसत आहे,
निसर्ग आणि मी एकटाच आज नहात आहे.
ओल्याचिंब सरी, अन पाणावलेले डोळे,
त्या पडणाऱ्या थेम्बाबरोबर माझे अश्रू हि ओले.
तुझ्याविना सखे आता,
पडणारा पाऊस जसा निखारा.
प्रत्येक थेंब गणिक मनात आठवणीचा तुफान वारा.
चालताना पाऊले जड होऊन गेली,
भिजलो मी मात्र मन माझे कोरडेच तू ठेवून गेली.
फुललेली वेली आणि आज हि फुले,
सुकलेली मात्र माझी प्रीत कळी.
रस्ते सर्व स्वच्छ मलीन झाल्या पायवाटा,
पाहताना मन उदास नयनाखाली अश्रूच्या लाटा.
सावरलो मी अन सावरले मन,
जाणतो तू नाही आणि तूच माझ्यात पण.