Wednesday, June 1, 2011

छंद नाही मला तुला पाहण्याचा,
पण ह्या नायांना कस समजावू.
नाही आठवणार तुला असे म्हणतो,
पण मन मात्र मानत नाही.

एका ढगाने दुसर्या ढगाला हळूच काहीतरी सांगितले,
प्रिये तू येणार आहे म्हणून आह ते हे मस्त होऊन बरसले.

सृष्टीने आज पर्नाचे हिरवे लेणे नेसले,
तुझ्यासवे सखे आज अनंत श्रावण बरसले.

खूप दिवसांनी तू आज मला वाटेत भेटली,
मिलनात आपल्या आज वरून राजाने हि हजेरी लावली.

गंध फुलांचा हळूच यावा, तुझ संगे प्रेमाला माझ्या मोहर यावा.

का कुणाच ठावूक हे शब्द प्रेम गीताच लिहितात,
तुझी ओढ माझ्या मनाला अलगद लावून जातात.

सांग न खरच तुला माझी आठवण येत नाही का?
माझ्या हृद्याच दुख: तुला कळत नाही का?

तुझा चेहरा आज खूपच आठवतो,
तुला पाहण्यासाठी आता मी नयनांना मिटवतो.

तू तुझ्या जगात नक्कीच सुखी असशील,
परंतु मनात तुझ्या हि काही माझ्या आठवणी असतील.