Saturday, June 4, 2011

अशी आहे ती.....

अशी आहे ती.....
एखाद्या रोपट्याने पाण्याच्या एका थेंबासाठी झुरावे अन अचानक मेघांनी बरसात करून त्या रोपाला जीवनदान द्यावे...
अशी आहे ती.....
लाखो शिपले शोधून शोधून थकून जावे अन अचानक हातामध्ये मोती सापडावा....
अशी आहे ती.....
ग्रीश्मामध्ये चालून चालून थकून जावे अन अचानकच घनदाट सावली दिसावी...
अशी आहे ती.....
दरी खोर्यात अवखळ बिनधास्त वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे ...
अशी आहे ती.....
काळोख्या रात्री चांदणे पडावे....
अशी आहे ती.....
तहानलेल्याला जलामृत बनणारी......
अशी आहे ती.....
लाजाळूच्या पानाप्रमाणे हलकेच लाजणारी.....
अशी आहे ती.....
आपण स्पर्श करावा आणि ती मलीन व्हावी इतकी नाजूक....
अशी आहे ती.....
अशांत माझ्या मनाला शांत करताना हसणारी..
अशी आहे ती.....