Wednesday, June 15, 2011

माहित असते मला हि तू येणार नाही,
पण  मन मात्र तुझी ओढ सोडत नाही,
मी समजावतो मला,
आणि मग मी हि त्याचे मन मोडत नाही.

काय मागावे मी तुझं कडे,
तूच ते देणारी,
अन तूच ते परत घेणारी,
माझ्याकडे उरलेला आहे फक्त हृदयाचा रिकामा कप्पा.

तारा तुटताना अनेक जन बघतात,
आणि त्याकडे काही न काही मागतात,
दुसर्याच्या तुटण्यात आपल सुख बघतात.

मी दवबिंदू तहानलेला, तू कमळ पाकळी,
स्पर्शितो तुझ मी जेव्हा, खुलते तुझी प्रीत कळी.
आसमंत हा खुलतो, बरसतात ह्या श्रावण सरी,
आपल्या प्रीत नाहून जात आहे आज हि सृष्टी सारी.

आज तर बरसत आहे जलधारा,
तुझ्याच वाटेवरी.
येवून जा एकदा सखे,
मी मदन वेडा तू माझी रती.