Friday, April 29, 2011

तिची ती काही पाऊले....


झनकार तुझ्या पाउलांचा, हुळूवार किती झाला.
हृदयातील प्रेम गीतांचा, आता अंत जवळ आला.
तोडून सर्व बंध तू, एकटीच उडाली.
आपल्या प्रेमाचे पंख तू छाटून गेली.
मी आवाज देत राहिलो, तू न कधी परत वळाली.
स्वर माझे मुके झाले, तू मात्र एकटीच गात राहिली.
हास्याचे ते काही क्षण, तू उधळून गेली.
मी गोळा करत राहिलो, अन तू फक्त बघत राहिली.
हातातून सोडून तू हात, बंध तोडीत गेली.
एक एक बंधाच्या त्या कड्या,
माझ्या ओंजळीत तू टाकून गेली.
सुचले नाही मला शब्द कधी, तेव्हा तू शब्द बनून गेली.
अन त्या शब्दांनीही हि मलाच, प्रेम यातना देवून तू गेली.
ती तिचा विरह, मागे  ठेवून गेली.
माझ्या नयना मध्ये मात्र, गंगा भरून गेली.
अन ठेवून गेली परत,
 न परत फिरणारी तिची ती काही पाऊले.