Friday, April 1, 2011

दादा तुझ्यासाठी

सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
तू दिलेल्या प्रेमासाठी काय माझे अर्पण करू.
तुझा तो मायेचा हाथ आणि प्रेमाची साथ,
मी कशी विसरू, सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
प्रत्येक क्षण-क्षणाला मला तू दिली साथ,
नाही कधी सोडले तू मला एकटे रणरंत्या उन्हात.
सावली तू दिली, दिला मला विसावा,
स्वतः मात्र उभा होतास तू निखार्याच्या वनात.
सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
माझा प्रत्येक श्वास का न मी तुझ्या वरती अर्पण करू?
आई जेव्हा रागवायची, तूच होता माझा आधार,
अजून हि मी गहिवरलो कि येतात अश्रू तुझ्याच नयनात.
तू माझ्या साठी कष्ट करतच आलास,
मी थोडे काही केले तर तू समाधानाने सदैव फुलून गेलास.
तू न कधी रागावलास न कधी भांडलास,
प्रेमाचे झरे तुझे मात्र तू गंगे प्रमाणे माझ्या वर सांडलास.
सांग दादा तुझ्या साठी काय मी करू,
तू जपून ठेवलेल्या मला मी कसे तुझ्या वर अर्पण करू.
मला जरा लागले तर तू किती रडलास,
माझ्या प्रत्येक खोडीला तू न रागावता  हसलास.
आपल्यातील प्रेम न कधी तू कमी केले,
जमेल तितके तू सदैव सुख मला दिले.
असाच तू दादा माझ्या बरोबर राहा,
तुझ्या मायेच्या सावली खाली मला तू पहा.